शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

शेकटा शिवारात गुटखा विक्रीचे होलसेल गोडाऊन उघडकीस; ५३ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 17:05 IST

 अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई

ठळक मुद्देझंवर यांच्याविरुद्ध यापूर्वीही अवैध गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली होती.

औरंगाबाद : करमाड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शेकटा शिवारात अनेक दिवसांपासून बिनबोभाट सुरू असलेल्या गुटख्याच्या गोडाऊनवर अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने बुधवारी रात्री धाड टाकली. या कारवाईत गोडाऊनमधून तब्बल ५२ लाख ३० हजार ६५२ रुपये किमतीचा गुटखा आणि १ लाख १८ हजार रुपयांचा प्रतिबंधित विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला. याविषयी करमाड ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. प्रवीण संजय झंवर, संजय गोविंददास झंवर, गोपाल संजय झंवर (सर्व रा.शेकटा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

याविषयी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांनी सांगितले की, औरंगाबाद-जालना रस्त्यावरील शेकटा येथील झंवर बंधूंच्या गोडाऊनमधून किरकोळ विक्रेत्यांना घाऊक दराने गुटखा विक्री केला जातो, अशी माहिती खबऱ्याने दिली होती. या माहितीची प्रथम खात्री करण्यात आली. यानंतर अधीक्षक मोक्षदा पाटील यांना याबाबत माहिती देऊन अप्पर अधीक्षक यांचे वाचक सहायक  पोलीस निरीक्षक अनमोल केदार, चिकलठाणा ठाण्याचे उपनिरीक्षक जी. टी. राऊत, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप वानखेडे, दीपक सुराशे आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांनी बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गोडाऊनवर धाड टाकली. तेव्हा गोडाऊनमध्ये राजनिवास पानमसाला, जाफरानी जर्दा, गोवा प्रिमियम १०००, आर.एम.डी. पानमसाला, रॉयल ७१७ तंबाखू, केशरयुक्त विमल पानमसाला आदी बंदी असलेल्या गुटखाच्या गोण्या आढळल्या. या गोण्यासोबतच एका कोपऱ्यात प्रतिबंधित सुमारे १ लाख १८ हजारांचे उडन गरम इंटरनॅशनल, ब्लॅक सिगारेटचे बॉक्स मिळाले. तेथे गुटखा असल्याचे निष्पन्न होताच अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सर्व मालाचा पंचनामा केला. यावेळी गुटखा आणि सिगारेटची एकूण किंमत ५३ लाख ४८ हजार ७५२ रुपये असल्याचे समोर आले. 

झंवर बंधंूवर यापूर्वीही कारवाईअप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या पथकाने ही धाड टाकून ५३ लाखांचा गुटखा आणि सिगारेट जप्त केला. शेकटा येथे झंवर बंधंूच्या घरासमोरच हे गोडाऊन होते. झंवर यांच्याविरुद्ध यापूर्वीही अवैध गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र यानंतरही त्यांनी गुटखा विक्री सुरूच ठेवल्याचे अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबादraidधाड