बीडमध्ये दोन ठिकाणी लाखाचा गुटखा जप्त
By Admin | Updated: July 1, 2017 00:35 IST2017-07-01T00:34:24+5:302017-07-01T00:35:36+5:30
बीड : अवैध गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांमधून तब्बल एक लाख १२ हजार रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला

बीडमध्ये दोन ठिकाणी लाखाचा गुटखा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अवैध गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांमधून तब्बल एक लाख १२ हजार रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली.
शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जीपमधून गुटखा जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर दरोडा प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही जीप पकडली. यामध्ये ६६ हजार रूपयांचा गुटखा आढळून आला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जगदीश विलास सोनवणे या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुटखा नितीन शिंदे व प्रशांत शिंदे यांचा असल्याचे सोनवणे यांनी जबाबात म्हटले आहे. तसेच त्यांच्याजवळील सात लाख रूपये किमतीची जीपही ताब्यात घेतली.
दुसरी कारवाई पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी करण्यात आली. स्कूटीमधून गुटखा विक्री घेऊन जात असताना विक्रांत बादाडे (रा.बीड) याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ५६ हजार रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू होती. ही कारवाई पोलिसांच्या मदतीने व सहायक आयुक्त अभिमन्यू केरूरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सुलोचना जाधवर यांनी केली.