५० लाखांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: March 12, 2017 23:12 IST2017-03-12T23:11:39+5:302017-03-12T23:12:13+5:30
तुळजापूर : शहरानजीकच्या सोलापूर- उस्मानाबाद बायपास मार्गावर तुळजापूर पोलिसांच्या पथकाने कारवाई करून ५० लाखाचा गुटखा जप्त केला़

५० लाखांचा गुटखा जप्त
तुळजापूर : शहरानजीकच्या सोलापूर- उस्मानाबाद बायपास मार्गावर तुळजापूर पोलिसांच्या पथकाने कारवाई करून ५० लाखाचा गुटखा जप्त केला़ ही कारवाई रविवारी सकाळी करण्यात आली असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक विना नंबर प्लेटची ट्रक हैद्राबादहून उस्मानाबादकडे जात असल्याची माहिती तुळजापूर पोलिसांना मिळाली होती़ या माहितीनंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी खांडवी, पोनि राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि रविकांत भंडारी व त्यांच्या सहकारी पोकॉ उमाकांत सरवदे, पोहेकॉ अमर माने, पोकॉ सुधीर माळी, पोना विश्वास साबळे, पोना पांडुरंग माने, पोना महेश कचरे यांच्या पथकाने बायपास मार्गावर कारवाई केली़ ट्रकचा चालक जाहीद भुरू खाँन (वय-२२ रा़ बलसमुद ताक़ासरवाड जिख़ारगाव) क्लिनर रामू राजु मंडलाई (वय-२० रा़ बलसमुद ता़ कासरवाड जिख़ारगाव) या दोघांना ताब्यात घेतले़
ट्रकची तपासणी केली असता ५० लाखाचा आतमध्ये २५० पोते गुटखा आढळून आला़ या मुद्देमालाचा पंचनामा अण्ण सुरक्षा अधिकारी डी़व्ही़पाटील, वाहन चालक डी़एमग़ाढवे यांनी केला़ पकडेला मुद्देमाल अन्न सुरक्षा पथकाने ताब्यात घेऊन ट्रक पोलिसांच्या ताब्यात दिला़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़ (वार्ताहर)