अंबडजवळ साडेतीन लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:12 IST2017-09-04T00:12:50+5:302017-09-04T00:12:50+5:30
गुन्हे शाखेच्या पथकाने जालना-अंबड रोडवर एका कारमधून विक्रीसाठी नेला जाणारा साडेतीन लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा पकडला

अंबडजवळ साडेतीन लाखांचा गुटखा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड/जालना : गुन्हे शाखेच्या पथकाने जालना-अंबड रोडवर एका कारमधून विक्रीसाठी नेला जाणारा साडेतीन लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा पकडला आहे. या प्रकरणी कार आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
भोकरदनकडून अंबडकडे जाणाºया एका पांढºया रंगाच्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी रात्री अकराच्या सुमारास अंबडजवळील एका बिअर बारकडे जाणाºया रस्त्यावर पांढºया रंगाच्या कारला (एमएच. ०४, ईटी ६५२४ ) थांबवून त्यातून ३ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला.
गुटखा व कारसह एकूण सात लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच चालक रामेश्वर नामदेव सवागे (२५, रा. नांजा, ता. भोकरदन) यालादेखील अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरवसे यांना माहिती दिली.
पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सहायक उपनिरीक्षक विश्वनाथ भिसे, कैलास कुरेवाड, रामेश्वर बघाटे, विष्णू चव्हाण, रंजित वैराळ, संजय मगरे, प्रशांत देशमुख, वैभव खोकले यांनी ही कारवाई केली.