गुरू भक्तांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 00:55 IST2017-01-28T00:54:57+5:302017-01-28T00:55:28+5:30
जालना : प.पू. १००८ गुरूदेव श्री गणेशलालजी म.सा यांची ५५ व्या पुण्यतिथी महोत्सवात शुक्रवारी विविध धार्मिक कार्यक्रम झाले.

गुरू भक्तांची मांदियाळी
जालना : कर्नाटक गजकेसरी, घोर तपस्वी प.पू. १००८ गुरूदेव श्री गणेशलालजी म.सा यांची ५५ व्या पुण्यतिथी महोत्सवात शुक्रवारी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यानिमित्त राज्यासह देशभरातील सुमारे ३० हजार गुरूभक्तांची मांदियाळी होती.
यानिमित्त सकाळपासूनच जालन्यात भाविक दाखल झाले. काही नजीकच्या शहरातील भाविक पायी दिंडीद्वारे जालन्यात दाखल झाले होते. शहरात दाखल झालेल्या या भाविकांची प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर प्रार्थना होऊन सकाळी ८. ३० वाजता जैन श्रावक संघाचे सुदेशकुमार सकलेचा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सभामंडपात आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात प. पू. प्रमोदकुमार म.सा., प्रकाशकंवर म. सा, उज्वलकुमार म. सा., सुशीलकुंवर म. सा, किरणसुधा म. सा., कीर्तीसुधा म.सा, प्रशांतकंवर म. सा, ज्ञानप्रभा म.सा, विशालप्रभा म.सा., आगमश्री म. सा., हर्षिता म.सा., नमिता म.सा., जयश्री म.सा., विनयकंवर म.सा., पुण्यस्मिता म.सा., प्राची म. सा, दिव्यप्रभा म.सा., चैतन्यश्री म.सा.,सजगश्री म.सा., प्रबोधी म.सा., स्वीकृतीप्रभा म.सा. आदी संतमहंतांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. कैलास गोरंट्याल आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे संघपती मिठालाल सकलेचा, अध्यक्ष सुदेश सकलेचा, उपाध्यक्ष डॉ. धरमचंद गादिया, महामंत्री स्वरूपचंद ललवाणी, सहसचिव कचरूलाल कुंकूलोळ, कोषाध्यक्ष भरत गादिया, विश्वस्त संजय मुथा, डॉ. गौतमचंद रूणवाल, विजयराज सुराणा, नरेंद्र लुणिया, सुरजमल मुथा, डॉ. कांतीलाल मांडोत यांच्यासह जैन समाज बांधवानी परिश्रम घेतले.