गुरूपिंपरी येथे जलयुक्तच्या कामांत अपहार!

By Admin | Updated: December 27, 2016 00:05 IST2016-12-27T00:05:52+5:302016-12-27T00:05:52+5:30

जालना : घनसावंगी तालुक्यातील गुरूपिंपरी येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृषी विभागाने पूर्ण केलेल्या कामांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला

Guruphipari water works in the ship! | गुरूपिंपरी येथे जलयुक्तच्या कामांत अपहार!

गुरूपिंपरी येथे जलयुक्तच्या कामांत अपहार!

जालना : घनसावंगी तालुक्यातील गुरूपिंपरी येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृषी विभागाने पूर्ण केलेल्या कामांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, तालुका कृषी अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सचिन अरविंद कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, कम्पार्ट बडींगची कामे न करता बोगस बिले तयार करून आर्थिक अपहार करण्यात आला आहे. यात सर्व्हे क्रमांक ३७९, ३८१, ४००, ३७४, ३६६ मध्ये कामे न करताच बिले उचलण्यात आली. तालुक्यात जेसीबीऐवजी ट्रॅक्टरने बांधाची कामे करण्यात आली आहेत. जेसीबी मशीनने चर खोदणे आवश्यक आहे. त्यात चराची रूंदी २. १५ मीटर खोली दीड फुट असेण आवश्यक आहे. ही कामे ट्रॅक्टरद्वारे करण्यात आली आहेत. बांधांना आकार देण्यात आलेला नाही. यासाठी अंदाजपत्रकात मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. परंतु ही कामे न करताच मोजमाप पुस्तिकेत खोट्या नोंदी करून बिले उचलून आर्थिक अपहार केला आहे. अंदाजपत्रकात तीन पाईची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कोठेही काम करण्यात आलेले नाही. बांधाचा टॉप मेंटन करताना खोट्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. बांधाची लांबी व रूंदी यात तफावत आढळते. सातबारावरील क्षेत्रातही फरक आहे. अनेक कामे निविदान न देताच करण्यात आली आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. कोल्हे यांनी जलयुक्त कामांच्या १६ बाबींमध्ये मोठे दोष काढून भ्रष्टाचार झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Guruphipari water works in the ship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.