रोटरी क्लबतर्फे गुरूगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST2020-12-17T04:27:08+5:302020-12-17T04:27:08+5:30

औरंगाबाद : आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन रोटरी क्लब ऑफ औरंगाबादतर्फे गुरूगौरव करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या या सोहळ्याला ...

Gurugaurav by Rotary Club | रोटरी क्लबतर्फे गुरूगौरव

रोटरी क्लबतर्फे गुरूगौरव

औरंगाबाद : आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन रोटरी क्लब ऑफ औरंगाबादतर्फे गुरूगौरव करण्यात आला.

नुकत्याच पार पडलेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजीचे प्रमुख डॉ. प्रवीण वक्ते यांची उपस्थिती होती.

रोटरीचे अध्यक्ष विजय जयस्वाल यांनी रोटरीच्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रा. किशोर साळवे, प्रा. अशोक पवार, प्रा. सुरेंद्र मोदी, केतकी नेवापूरकर,शालेय शिक्षक अनिल सोनवणे, मोमीन आयेशा, कामिनी सुरांगलीकर, वंदना रसाळ, राजेश अचारी, सोनाली पाटील, दिलीप कलवांकर, संध्या मेश्राम, राधिका देशपांडे, वशिष्ठ लोकरे, क्रांती देशमुख, वैशाली गुळवे, सुनिता नागकीर्ती यांना पुरस्कार देण्यात आला. सूत्रसंचालन सुरज डुमणे यांनी केले.

प्रकल्प प्रमुख वंदन गोटसकर, उपप्रांतपाल नरेंद्र खंडेलवाल तसेच सचिव समीर कानडखेडकर, कोषाध्यक्ष सरीता लोणीकर यांची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Gurugaurav by Rotary Club