८५ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार
By Admin | Updated: August 23, 2014 00:47 IST2014-08-23T00:04:57+5:302014-08-23T00:47:29+5:30
नांदेड : जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या गुरुगौरव पुरस्काराला तब्बल तीन वर्षानंतर मुहूर्त सापडला आहे.

८५ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार
नांदेड : जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या गुरुगौरव पुरस्काराला तब्बल तीन वर्षानंतर मुहूर्त सापडला आहे. येत्या २४ आॅगस्ट रोजी मुखेड येथे तीन वर्षाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जि.प.अध्यक्ष दिलीप पा.बेटमोगरेकर यांनी दिली.
शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्यावतीने उत्कृष्ट शिक्षकांना जिल्हास्तरावर उत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो. मुखेड येथील मुलींचे जिल्हा परिषद हायस्कुल येथे रविवार २४ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात २०११ मधील ३० शिक्षक, २०१२- २६ तर १०१३ मधील २९ अशा तीन वर्षातील उत्कृष्ट ८५ शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.
गुरुगौरव पुरस्काराचे वितरण पालकमंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार असून विशेष अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर राहणार असून खा.राजीव सातव, खा.सुनील गायकवाड, आ.विक्रम काळे, आ.सतीष चव्हाण, आ.अमरनाथ राजुरकर, आ.ओमप्रकाश पोकर्णा, आ.वसंतराव नाईक, आ.शंकरअण्णा धोंडगे, आ.प्रदिप नाईक, आ.माधवराव पा.जवळगांवकर, आ.रावसाहेब अंतापुरकर आंदिची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी उपाध्यक्ष प्रकाश राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, शिक्षण सभापती संजय कऱ्हाळे, एकनाथ मडावी, उपशिक्षणाधिकारी पाटील, जीवनराव वडजे आदिंची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)