कळंबमध्ये गुटखा जप्त
By Admin | Updated: March 14, 2016 00:36 IST2016-03-14T00:25:41+5:302016-03-14T00:36:42+5:30
कळंब : शहरातील बसस्थानकाजवळील एका गोडाऊनमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून एक दोन नव्हे जवळपास २८ लाखाचा गुटखा जप्त केला आहे़

कळंबमध्ये गुटखा जप्त
कळंब : शहरातील बसस्थानकाजवळील एका गोडाऊनमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून एक दोन नव्हे जवळपास २८ लाखाचा गुटखा जप्त केला आहे़ ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़
राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातलेली असतानाही जिल्ह्यात अवैधरित्या गुटखाविक्री थांबविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे़ कळंब शहरात अवैधरित्या विक्रीसाठी लाखो रूपयांचा गुटखा साठवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती़ या माहितीवरून स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर, दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोउपनि भास्कर पुल्ली, फौजदार आवटी यांच्यासह झोंबाडे, कळसाईन, दशवंत, सरडे, नज्जू शेख यांच्या पथकाने रविवारी दुपारी बसस्थानकानजीकच्या गोडाऊनमध्ये धडक कारवाई केली़ या कारवाईत जवळपास २८ लाखांच्या गुटख्यासह सुगंधी पानमसाला जप्त करण्यात आला आहे़ या कारवाईमुळे अवैध गुटखाविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ दरम्यान, या गुटख्याची मोजदाद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती़