यावेळी शहर उपप्रमुख संतोष खेंडके, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, सूर्यकांत जायभाये, मनोज गांगवे, रवी गायकवाड, बापू कवळे, अजय गटाणे, ज्ञानेश्वर गायकवाड, सचिन जेजूरकर, कैलास तिवलकर, भरत ढवळे, साईनाथ जाधव, राज नीळ, सोनू अहिले, सिद्धार्थ वडमारे, कांता पाटील, गणेश जैस्वाल, राम केकाण, उत्तम गवळी, हिंमत पटेल आदींसह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.
----------------------------------------------------
फोटो कॅप्शन:
गुंठेवारी वसाहतींमधील घरे नियमित करण्याच्या शासन निर्णयाबाबत नागरिकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करताना राजू वैद्य. सोबत शिवेसना पदाधिकारी.
-------------------------------------------------------------
एमजीएम परिसरातील रस्ता उखडला
औरंगाबाद : एमजीएममधून एन-१ कडे येणारा रस्ता खराब झाला आला आहे. सदरील रस्त्याचे मजबुतीकरण कोण करणार, असा प्रश्न आहे. महालक्ष्मी मंदिराच्या बाजूने येणाऱ्या त्या रस्त्यावरून जड वाहनेदेखील जात आहेत. सदरील रस्ता तातडीने बांधावा, अशी मागणी होत आहे.
रस्त्यावरील गतिरोधक उखडले
औरंगाबाद : सूतगिरणी चौक ते गजानन महाराज मंदिर आणि जयभवानीनगर ते पुंडलिकनगरमार्गे गजानन महाराज मंदिर या रस्त्यावर बसविलेले गतिरोधक उखडले आहेत. ते गतिरोधक दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
-----------
हायमास्टवरील दिव्यांचा प्रकाश कमी
औरंगाबाद : गजानन महाराज मंदिरासमोरील चौकात बसविण्यात आलेल्या हायमास्टवरील दिव्यांचा प्रकाश कमी प्रमाणात पडतो आहे. त्या हायमास्टवर फोकस बसविण्याची मागणी नागरिक वारंवार करीत आहेत. मात्र, अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.
------------
कोर्ट परिसरात कोंडी
औरंगाबाद : हायकोर्टलगतच्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे.
एकेरी रस्ता असताना त्यामध्ये दुभाजक टाकण्यात आले आहेत. त्यामुळे डाव्या आणि उजव्या बाजूने वाहन वळण्यास जागा नसल्याने वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच झाली आहे.
------------
रस्त्यांवर धूळ आणि कचरा
औरंगाबाद : शहरातील बहुतांश रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मनपाने दुभाजक स्वच्छ करून गोळा केलेली माती व झाडांची छाटणी केल्यानंतर कचरा हवेसोबत उडत असल्यामुळे तो सर्वत्र पसरतो.
------------
रस्त्याच्या कामाला गती द्या
औरंगाबाद : सूतगिरणी चौकातील सिमेंट रस्त्याच्या कामाला गती देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. मागील काही दिवसांपासून एकेरी वाहतुकीमुळे व्यापाऱ्यांचे व्यावसायिक नुकसान होत असल्याची ओरड होत आहे.
-------------
पथदिवे बंद; मनपाचे दुर्लक्ष
औरंगाबाद : गजानन महाराज मंदिर परिसरातील अनेक वॉर्डांतील अंतर्गत पथदिवे बंद असल्यामुळे नागरिक मनपाकडे तक्रार करीत आहेत. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने ते तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहेत, तर अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी पथदिव्यांसाठी तक्रारी केल्या, तर तेदेखील दखल घेत नसल्याचे चित्र आहे.
----------
अग्रसेन चौक ते एन-५ रस्ता उखडला
औरंगाबाद : जालना रोडवरील अग्रसेन चौक ते एन-५ कडे जाणारा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. वाहनचालकाला रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्या रस्त्याचे काम सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
------------
सिमेंटच्या रस्त्याला तडे
औरंगाबाद : कामगार चौक ते एन-४ कडे येणाऱ्या सिमेंटच्या रस्त्याचे क्युरिंग उखडले आहे, तसेच काही ठिकाणी रस्त्याला तडे गेल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, तसेच पुंडलिकनगर, हनुमान चौक ते एन-४ कडे जाणारा रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला आहे. तो दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
-------------
रस्त्याच्या बाजूने खोदकाम
औरंगाबाद : जालना रोड ते जयभवानीनगर अंतर्गत इंटरनेट केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या बाजूला खोदकाम सुरू आहे. हे काम एका रेषेत नसून, जशी जागा मिळेल तसे खोदकाम करण्यात येत आहे. हे काम सुरळीत करण्याची मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे.