छावणी परिषदेचा वाद गुलमंडीपर्यंत!
By Admin | Updated: December 7, 2014 00:19 IST2014-12-07T00:07:46+5:302014-12-07T00:19:05+5:30
औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपात अन्याय झालेला सेनाचा कार्यकर्ता रमेश लिंगायत आज दुपारी थेट गुलमंडीपर्यंत पोहोचला.

छावणी परिषदेचा वाद गुलमंडीपर्यंत!
औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपात अन्याय झालेला सेनाचा कार्यकर्ता रमेश लिंगायत आज दुपारी थेट गुलमंडीपर्यंत पोहोचला. त्याने खा. चंद्रकांत खैरे यांनाच तिकीट न देण्याबाबत जाब विचारला. त्यामुळे सेनेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली.
सेनेत मागील २६ वर्षांपासून काम करणारे रमेश लिंगायत छावणीच्या वॉर्ड क्र. ४ मधून इच्छुक होते. हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांनी पत्नी मंगल रमेश लिंगायत यांच्यासाठी तिकीट मागितले. त्यांना पक्षाकडून होकारही देण्यात आला. ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करीत सेनेचे कार्यकर्ते अनिल जैस्वाल यांच्या पत्नी पद्मा जैस्वाल यांना तिकीट देण्यात आले. या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी लिंगायत शनिवारी दुपारी गुलमंडीवर महाआरतीत दाखल झाले. आरतीचा कार्यक्रम संपल्यावर त्यांनी खा. खैरे यांच्याशीच वाद घातला. यावेळी अंबादास दानवे, सुहास दाशरथे, प्रदीप जैस्वाल आदी नेतेही उपस्थित होते. त्यांचा रोष लक्षात घेऊन नेत्यांनी त्याला बाजूच्या एका दुनाकात नेऊन राग शांत करण्याचा प्रयत्न केला.
मागील छावणी परिषदेच्या निवडणुकांमध्ये पक्षाअंतर्गंत बंडखोरी, अंतर्गत कलह, दुसऱ्या पक्षांना मदत करून उपाध्यक्षपद मिळविणे आदी कारणांवरून सेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख प्रदीप जैस्वाल यांना पद गमवावे लागले होते.