मतमोजणीसाठी प्रशासन झाले सज्ज

By Admin | Updated: October 19, 2014 00:20 IST2014-10-18T23:58:47+5:302014-10-19T00:20:11+5:30

जालना : जिल्ह्यात पाचही मतदारसंघांमध्ये १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर आता रविवारी पाचही ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

Guidance was ready for counting | मतमोजणीसाठी प्रशासन झाले सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन झाले सज्ज


जालना : जिल्ह्यात पाचही मतदारसंघांमध्ये १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर आता रविवारी पाचही ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
मतमोजणी प्रक्रिया सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. जालना येथे औरंगाबाद रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात, भोकरदन येथे नगरपरिषद मंगल कार्यालय, बदनापूर येथे कृषी महाविद्यालय, घनसावंगी येथे तहसीलजवळील शासकीय गोदामात तर परतूर येथे जवाहर नवोदय विद्यालयात मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यात परतूर येथे २३ तर अन्य चारही मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या २२ फेऱ्या होणार आहेत. सर्वप्रथम टपालाद्वारे आलेल्या मतपत्रिकांची मोजणी होईल.
प्रत्येक टेबलवरील मतमोजणी व्हिडीओ चित्रीकरण करण्यासाठी सी.सी.टिव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून याशिवाय प्रत्येक केंद्रात व्हिडीओ चित्रीकरण करणारे तीन फिरते पथकेही कार्यरत राहणार आहेत.
मतमोजणी केंद्रात मोबाईलच्या वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे. ज्या व्यक्तींकडे निवडणूक विभागामार्फत प्रवेशासाठी पास देण्यात आली, त्यांनी सोबत स्वत:चे ओळखपत्रही बाळगणे आवश्यक असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
निवडणूक कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे रंगीत तालिम जालना केंद्रावर निवडणूक निर्वाचन अधिकारी मंजुषा मुथा, भोकरदन केंद्रावर लक्ष्मीनारायण मिश्रा, बदनापूर केंद्रावर डॉ. भारत कदम, परतूर केंद्रावर अरविंद लोखंडे तर घनसावंगी केंद्रावर डॉ. श्रीमंत हारकळ यांनी दिले. सर्व मतदान केंद्रांवर मतमोजणीचा अंतिम निकाल दुपारी २ वाजेपर्यंत मिळणे अपेक्षित आहे.
केंद्रात प्रवेशासाठी पोलिसांकडून होणार तीनवेळा तपासणी
मतमोजणीच्या २२ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक टेबलवर तीन मतमोजणी कर्मचारी व त्यांच्या मदतीला एक शिपाई याप्रमाणे चार कर्मचारी असणार आहेत. प्रत्येक फेरीतील मोजणी अंदाजे २० मिनिटात संपणार आहे. प्रत्येक केंद्रावर २५० ते ३०० मतमोजणी कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. निवडणूक निर्वाचन अधिकारी, त्यांचे सर्व सहकारी, निवडणूक कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रात सभागृहाच्या आतील बाजूने प्रवेश असेल. तर उमेदवारांचे एजंट, पत्रकार यांना बाहेरील बाजूने प्रवेश राहिल. मात्र प्रत्येकास प्रवेश देताना पोलिसांमार्फत तीन ठिकाणी तपासणी केली जाणार आहे.
मतमोजणी केंद्राच्या आवारात कोणत्याही वाहनास (निवडणूक अधिकारी वगळता) प्रवेश राहणार नाही. मात्र केंद्राच्या बाहेरील बाजूने चंदनझिराकडे जाणाऱ्या मार्गावर तर अन्य केंद्रांवरही मतमोजणी परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर राज्य पोलिस कर्मचाऱ्यांसोबतच सेना सुरक्षा बलाचे ५० जवानांची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
मतमोजणीच्या पूर्वसंध्येला पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची रंगीत तालिम घेण्यात आली. निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांसह केंद्रीय निरीक्षकांची यावेळी उपस्थिती होती.विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीसाठी व्यवस्था, निकाल संकलनासाठी आवश्यक व्यवस्था, सर्व स्ट्राँगरूमवर देखरेख, संकलन आदी कामांची रंगीत तालीम घेण्यात आली.

Web Title: Guidance was ready for counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.