इंधन बचतीवर चालकांना मार्गदर्शन
By Admin | Updated: January 16, 2016 23:17 IST2016-01-16T23:13:42+5:302016-01-16T23:17:01+5:30
हिंगोली : येथील मध्यवर्त्ती बसस्थानकात १६ जानेवारी इंधन बचत पंधरवड्याचे उद्घाटन परभणी येथील विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांच्या हस्ते झाले.

इंधन बचतीवर चालकांना मार्गदर्शन
हिंगोली : येथील मध्यवर्त्ती बसस्थानकात १६ जानेवारी इंधन बचत पंधरवड्याचे उद्घाटन परभणी येथील विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांच्या हस्ते झाले. चालक व यांत्रिकी विभागातील कामगारांना इंधन बचतीसंदर्भात लहान-सहान बाबी समजून सांगितल्या.
शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाचे विभाग प्रमुख आनंद लोळगे, आगारप्रमुख आर. वाय. मुपडे, खुराणा सावंत अभियांत्रिकी विद्यालयाचे संचालक सुरेंद्र सावंत, यू. एस. साखरे, ए. आर. लोलगे, मिलींद सांगळे, डी. बी. जटाळे उपस्थित होते. मुपडे म्हणाने, हिंगोली आगाराला महिन्याकाठी ७० लाखांचे डिझेल लागत असून, त्यापासून ५ ते ६ कोटींचे उत्पन्न मिळते. परंतु त्यात अजून वाढ करण्यास इंधन खर्च कमी करण्याच्या तांत्रिक बाबी चालकांना समजून सांगितल्या. लोळगे यांनी चालकांना टेक्निकल बाबी समजावून सांगत चालकांनी गाडीतील हवा तपासावी, अॅक्सलेटरचा किती प्रमाणात दाबावे, इंजिनमध्ये बिघाड वाटल्यास त्याचे काम ताबडतोब करावे, भरधाव वेगाने गाडी चालवल्यानेही जास्त इंधन खर्च होते, या प्रकाराने केवळ आगाराचेच नव्हे तर संपूर्ण देशाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वाहतूक नियंत्रक गाभणे, साखरे, सांगळे यांनी इंधन ही नैसर्गिक साधनसंपत्ती असल्याने ती के व्हा संपेल याचा काही नेम नाही. त्यामुळे इंधन बचतीकडे जास्ती-जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. इंधन बचत पंधरवाडा १६ ते ३१ जानेवारीपर्यंत साजरा केला जाणार आहे. सूत्रसंचालन वैभव वरवंटे यांनी तर गजानन चव्हाण यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)