यशस्वी गुंतवणुकीविषयी केले मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:12 IST2021-01-08T04:12:07+5:302021-01-08T04:12:07+5:30
औरंगाबाद जिल्हा काण्व ब्राह्मण समाजातर्फे नुकतेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किशोर कदम यांच्यासह अविनाश आडसकर, ...

यशस्वी गुंतवणुकीविषयी केले मार्गदर्शन
औरंगाबाद जिल्हा काण्व ब्राह्मण समाजातर्फे नुकतेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किशोर कदम यांच्यासह अविनाश आडसकर, राजू कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जयपूरकर व नंदकुमार सोनोनी यांनी पाहुण्याचे स्वागत केले.
बँकिंग, धातू, हेल्थकेअर, स्थावर, ऑइल अँड गॅस, वाहन आदी क्षेत्रांत गुंतवणूक विभागलेली ठेवावी. शेअरमधील रक्कम अंशत: नफा ठेवून काढावी, वयानुसार गुंतवणूक जोखीम कशी ठेवावी, याविषयी या कार्यक्रमात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
पुरुषोत्तम भाले यांनी आभार मानले. संगीता कागबट्टे, प्रमोद कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. धनंजय सिमंत यांनी सूत्रसंचालन केले. आर. के. कुलकर्णी, कार्याध्यक्ष धनंजय कुलकर्णी, दीपक खळेगावकर, प्रवीण शिरोडकर, अलका भाले, धनंजय पांडे, उदय मानवतकर यांच्यासह इतर सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.