युपीएससी, एमपीएससीबाबत मार्गदर्शन शिबीर
By Admin | Updated: August 13, 2014 00:45 IST2014-08-13T00:34:06+5:302014-08-13T00:45:54+5:30
नांदेड : लाईफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट नांदेड मार्फत पदवी दरम्यान युपीएससी, एमपीएससी तयारी कशी करावी या बाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

युपीएससी, एमपीएससीबाबत मार्गदर्शन शिबीर
नांदेड : लाईफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट नांदेड मार्फत पदवी दरम्यान युपीएससी, एमपीएससी तयारी कशी करावी या बाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कुसुम सभागृह आयटीएम कॉलेज येथे १३ आॅगस्ट रोजी सायंकाळी पाच ते आठ दरम्यान हा कार्यक्रम होईल.
लालबहाद्दूर शास्त्री आयएएस ट्रेनिंग सेंटर मुसरी येथे प्राध्यापक म्हणून रुजू असलेले प्रा. डॉ. संजय बंग व युपीएससी २०१४ मध्ये ८४ वा रँक मिळवून आयएएस झालेले डॉ. विजय राठोड यांचे मार्गदर्शन होणार आहे. उद्घाटन यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते होईल. पदवी दरम्यान प्रत्येक विद्यार्थी आयएएस, आयपीएस हे स्वप्न पाहतो. पण पदवीनंतर करिअरमध्ये लवकर स्थिर होण्यासाठी पीएसआय, एसटीआय कडे वळतो. यावर उपाय म्हणजे पदवी दरम्यानच युपीएससी, एमपीएससीची तयारी सुरु करणे. सदरील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)