‘गुढी’ला महागाईचा हार; लातूरचा बाजार थंड

By Admin | Updated: March 17, 2015 00:42 IST2015-03-17T00:18:47+5:302015-03-17T00:42:28+5:30

लातूर : हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडवा हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे़ पाडव्याला उभारण्यात येणाऱ्या गुढीला पूजेसाठी गाठी लावण्यात येतात़

Gudiya's loss of inflation; Latur's market cools down | ‘गुढी’ला महागाईचा हार; लातूरचा बाजार थंड

‘गुढी’ला महागाईचा हार; लातूरचा बाजार थंड


लातूर : हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडवा हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे़ पाडव्याला उभारण्यात येणाऱ्या गुढीला पूजेसाठी गाठी लावण्यात येतात़ शिवाय, आप्तस्वकियांतील मुलांना गाठी भेट दिल्या जातात़ यावर्षी गारपीट अन् वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे शेतकरी आर्थिक डबघाईला आल्याने गुढीपाडव्याच्या खरेदीला अजूनही ग्राहकांची गर्दी नाही.
दरवर्षी बाजारात पाडव्याला साखर व खारीक, खोबऱ्याच्या गाठी विक्रीसाठी येतात़ पाडव्यासाठी साखरेच्या गाठी तयार करणारे लातुरात जवळपास १० ते १२ कारखाने आहेत़ यावर्षी या कारखानदारांनी गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन कमीच घेतले आहे़ पाडवा चार दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही ग्राहकांना प्रतिसाद नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़ साखरेच्या दरात यंदा घसरण झाली असली तरी गाठींचे दर मात्र गतवर्षीचेच आहेत़ यावर्षी किरकोळ विक्री ७० ते ८० रूपये किलोप्रमाणे होत असून खोबऱ्याचे हार १४० ते १६० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहेत़

Web Title: Gudiya's loss of inflation; Latur's market cools down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.