रस्त्यांच्या निधीचा प्रश्न पालकमंत्र्यांनी टोलवला
By Admin | Updated: March 13, 2016 14:25 IST2016-03-13T14:21:18+5:302016-03-13T14:25:05+5:30
हिंगोली : पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी टोलवाटोलवी केली.

रस्त्यांच्या निधीचा प्रश्न पालकमंत्र्यांनी टोलवला
हिंगोली : सार्वजनिक बांधकाम विभागाने जि.प.च्या रस्त्यांवर टाकलेल्या कामांना जि.प.ची ना-हरकत नसल्याने ब्रेक लागला आहे. त्यामुळे यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी टोलवाटोलवी केली.
यात जिल्हा परिषदेचे रस्ते असले तरी प्रत्येकी पन्नास टक्के याप्रमाणे निधी दिल्याचे ते म्हणाले. त्यामुळे जिल्हा परिषदेला निधी दिला नाही, असे नाही. मात्र आता ना-हरकत मिळत नसल्याच्या मुद्यावर मात्र ते काहीही बोलले नाही. त्यामुळे या प्रश्नावर पुढील भूमिका कळाली नाही.
दरम्यान, प्रशासन आता जि.प. उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे यांच्याकडे याबाबत विचारणा करीत आहे. तर त्यांनी मात्र जि.प.ला निधी मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही. यात इतर सदस्यांचीही मागणी आहे. त्यामुळे निधीसह कामे वर्ग न झाल्यास आयुक्तांकडे दाद मागणे हाच एकमेव पर्याय आहे. अर्थसंकल्पीय कामे वगळता इतर कामे ग्रामीण रस्त्यावर होत असल्यास ती जि.प.कडूनच करून घ्यावी, या शासन आदेशाचा दाखलाही त्यांनी दिला. त्याचबरोबर खासदार-आमदारांच्या मतदारसंघात होणारी कामे ही जि.प.च्या मतदारसंघातच होतात. तर जि.प. ही सक्षम यंत्रणा आहे. त्यामुळे त्यांनी कोणताही भेदभाव पाळू नये, असे आवाहन केले. (जि.प्र.)