पीककर्ज वाटपाचा आढावा पालकमंत्री, पालक सचिव घेणार

By Admin | Updated: June 24, 2016 01:26 IST2016-06-24T00:31:23+5:302016-06-24T01:26:18+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यात बँकांकडून पीककर्ज वाटपात विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पीककर्ज वाटपाचा आढावा येत्या तीन दिवसांत पालकमंत्री

Guardian Minister, Guardian Secretary to review the crop allocation | पीककर्ज वाटपाचा आढावा पालकमंत्री, पालक सचिव घेणार

पीककर्ज वाटपाचा आढावा पालकमंत्री, पालक सचिव घेणार


औरंगाबाद : मराठवाड्यात बँकांकडून पीककर्ज वाटपात विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पीककर्ज वाटपाचा आढावा येत्या तीन दिवसांत पालकमंत्री आणि पालक सचिवांनी तातडीने घ्यावा, अशा सूचना करण्यात आल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ज्या बँका पीककर्ज देण्यात अडचणी आणत असतील तर, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री रामदास कदम, दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर यांच्यासह पालक सचिवांना विभागात जाऊन पीककर्जाचा आढावा घ्यावा लागणार आहे. बँकांना पीककर्ज आणि पीक विम्याची रक्कम देण्यात आली असली तरी चलन तुटवडा असल्यामुळे ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर असली तरी त्यांच्या हाती पडलेली नाही. या प्रकरणाची माहिती घेण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यातील भूजल पातळी घटली आहे, त्यासाठी वॉटर ग्रीडची निर्मिती करण्यात येणार आहे. येत्या ३ महिन्यांत अहवाल प्राप्त होईल.
मराठवाड्यातील औद्योगिक विकासासाठी मुंबई ते नागपूर या सुपर हायवेची निर्मिती करण्यात येत असून, येत्या मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेला कर्ज वाटपासाठी सरकारी मदत करण्याची तयारी असल्याचे सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे या बँकांना देण्यात आलेले पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकांना वाटून देण्यात आले आहे.

Web Title: Guardian Minister, Guardian Secretary to review the crop allocation