कर्जमाफीसह हमीभावही हवाच!
By Admin | Updated: June 24, 2017 23:33 IST2017-06-24T23:31:04+5:302017-06-24T23:33:15+5:30
हिंगोली : मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफी व हमीभावावरून रान पेटविले होते. शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तरीही हमीभावाचे भिजत घोंगडे आहे

कर्जमाफीसह हमीभावही हवाच!
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफी व हमीभावावरून रान पेटविले होते. शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तरीही हमीभावाचे भिजत घोंगडे आहे. त्यात शासन वेळ घालवत असल्याचे शेतकऱ्यांना वाटत असून कर्जमाफीबद्दल तेवढे समाधानी आहेत.
भाजपने निवडणुकीतच कर्जमाफी आणि हमीभावाची ग्वाही दिली होती. तर आता त्यांचे सरकार आल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा चांगली पिके आली. त्याला भाव नसल्याने शेतकरी संपापर्यंत प्रकरण चिघळले. त्यानंतर कर्जमाफी व हमीभाव हे दोन्ही प्रश्न सोडविण्याचे शासनाने आश्वासन दिल्यावर शेतकऱ्यांनी हमीभावासाठी व्यापाऱ्यांनाही सक्ती करावी, कायदा करावा अथवा स्वत: खरेदी करावी, असे मत मांडले. तर हमीभाव दिल्याशिवाय आणि कर्जप्रकरणाची प्रक्रिया सुलभ केल्याशिवाय हे आंदोलन यशस्वी म्हणता येणार नाही, असे शेतकऱ्यांना वाटते.