शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

जीटीएलने हस्तांतरणानंतर वीज बिल घेतले

By admin | Updated: December 8, 2014 00:23 IST

अशोक कारके, औरंगाबाद महावितरणने जीटीएलकडून शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेतला आहे.

अशोक कारके, औरंगाबादमहावितरणने जीटीएलकडून शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेतला आहे. जीटीएलने वीजपुरवठ्याच्या हस्तांतरणानंतर काही मोठ्या वीज ग्राहकांचे (उद्योजकांचे) विज बिल घेतले आहे. कंपनी ही माहिती महावितरणला देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.जीटीएलकडून महावितरणने १५ नोव्हेंबर रोजी वीजपुरवठा ताब्यात घेतला आहे. यानंतर कंपनीने काही उद्योजकांचे वीज बिल चेकच्या माध्यमातून घेतले आहे. शहरातील वीज ग्राहकांकडे १३४ कोटींचे वीज बिल थकले आहे. ते वसूल करण्यासाठी महावितरणसमोर मोठे आव्हान आहे. महावितरणने वीज ग्राहकांकडून वीज बिल वसुली सुरू केली आहे. नागरिकांना बिल भरता यावे म्हणून पहिल्या टप्प्यात शहरात २२ ठिकाणी वीज बिल भरणा केंद्र सुरू केले आहे. त्या पेक्षा एक पाऊल पुढे टाकून विविध ठिकाणी ३ एटीपी मशीन बसविल्या आहेत. ४ बसविणार आहेत. वीज बिलाच्या वसुली मोहिमेमध्ये काही उद्योजकांनी हस्तांतरणानंतर जीटीएलकडे वीज बिल भरल्याची माहिती समोर आली आहे. हे मोठ्या ग्राहकांचे (उद्योजकांचे) चेक कंपनीने आपल्या खात्यावर जाम करून घेतले आहेत. कंपनी हस्तांतरणानंतर किती ग्राहकांनाचे बिल घेतले, त्यांची नावे आणि रक्कम आदी माहिती महावितरणाला देण्यास टाळाटाळ करीत आहे. कंपनीने ही माहिती महावितरणला द्यावी यासाठी अधिकाऱ्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले; पण त्यांना जीटीएलने काही माहिती दिली नाही. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अखेर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखीपत्र देऊन माहिती मागितली आहे. आता कंपनीचे वरिष्ठ अधिकारी हस्तांतरणातील असहकार्य मोहीम थांबवून महावितरणला माहिती देणार का? महावितरण माहिती न दिल्यामुळे कंपनीची एनओसी थांबविणार का? असे अनेक प्रश्न यातून उभे आहेत. या मनमानी कारभाराविषयी जीटीएलचे स्थानिक प्रमुख जगदीश चेलारामानी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांनी याविषयी बोलण्यास टाळले.