शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

जीएसटी कपात: छोट्या दुकानदारांकडे जुने भाव, तर सुपर शॉपीत सवलती! ग्राहकांमध्ये संभ्रम

By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 4, 2025 18:36 IST

व्यापारी म्हणतात किमती कमी होण्यास आणखी महिनाभर लागेल

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने जीएसटीत कपात जाहीर केल्यानंतर ग्राहकांना भावकपातीचा त्वरित लाभ मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, घोषणा होऊन १२ दिवस झाले तरी अजूनही किराणा व्यापारी जुना एमआरपीतच माल विकत आहेत, तर सुपर शॉपी, मॉलमध्ये जुन्या वस्तूवर नवे दर लागू झाले आहेत. एकीकडे व्यापाऱ्यांमध्ये वैचारिक गोंधळ उडाला आहे. किमतीमधील विरोधाभासामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे.

काय म्हणतात ग्राहक-व्यापारीआमच्या प्रतिनिधीने मोंढ्यात फेरफटका मारला असता किराणा सामान खरेदीसाठी आलेल्या संजय विसपुते यांनी सांगितले की, सरकारने जीएसटी कपात केली तरी दुकानदारांकडे दर कमी होत नाहीत. मग सवलतीचा फायदा नेमका कोणाला मिळतो? दुसरीकडे व्यापारी सांगत आहेत की, जुना साठा संपेपर्यंत दरात प्रत्यक्ष घट होणे अशक्य आहे. जीएसटी कमी झालेला नवीन एमआरपीचा माल बाजारात येण्यास आणखी महिनाभराचा अवधी लागेल. कारण, कंपन्यांकडे जुनी एमआरपी असलेला माल मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे.

सुपर शॉपी, माॅलवाल्याने केले भाव कमीएकीकडे किरकोळ किराणा विक्री करणारे व्यापारी जुन्या एमआरपीच्या वस्तू विकत आहेत, तर दुसरीकडे सुपर शाॅपी व मॉलवाल्यांनी जुन्या एमआरपीवर जीएसटीची कपात लागू करून ती विकणे सुरू केले आहे.

प्रकार जुनी एमआरपी नवी एमआरपी

१) टूथपेस्ट (१०० ग्रॅम) ७६ रु.-- ७० रु.२) सुगंधित साबण (१५० ग्रॅम) ८० रु.--७२ रु.३) अँटिसेफ्टिक साबण (१०० ग्रॅम) ४६ रु.--४० रु.४) टूथब्रश ३० रु.---२५ रु.५) शॅम्पू (१०० ग्रॅम) ६० रु.--५५ रु.६) फरसान (प्रति किलो) १४५ रु.-- १३५ रु.७) टोमॅटो सॉस (९०० ग्रॅम) १०० रु.--९३रु.८) जॅम (५०० ग्रॅम) २०० रु.--१८५ रु.९) बिस्कीट (१ किलो) १६० रु.--१४० रु.

भाव तेच वजन वाढविलेकाही कंपन्यांनी टूथपेस्ट व बिस्किटांचे एमआरपी जुन्याच ठेवल्या; पण वजन वाढविले आहे. जुनी किंमत १० रुपये कायम ठेवून टूथपेस्टचे जुने वजन १५ ग्रॅम होते ते वजन वाढून १८ ग्रॅम केले आहे, तर १० रुपयांच्या बिस्कीटचे भाव तेच ठेवून वजन ८० ग्रॅम हून ११० ग्रॅम केले आहे.

जीएसटी कपात करून विकाकेंद्र सरकारने किराणा दुकानातील काही वस्तूंवरील जीएसटी कपात केली आहे. ज्या व्यापाऱ्यांची नोंद जीएसटीत आहे. अशा व्यापाऱ्यांनी एमआरपीतून जीएसटी कपात करून माल विकणे आवश्यक आहे. इतर व्यापाऱ्यांनी आपल्या डीलर्सशी बोलून जीएसटी कपात करून माल विकावा.-संजय कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

किराणा सामानावर किती टक्के जीएसटीप्रकार             आधी जीएसटी - आता जीएसटी१) किराणा सामान १८- १२ - ५ टक्के ---- आता ५ टक्के२) रोजच्या वापरातील वस्तू-- १८ व १२ टक्के--- आता ५ टक्के

English
हिंदी सारांश
Web Title : GST Cut Confusion: Small Shops Old Prices, Super Shops Offer Discounts!

Web Summary : GST cut causes confusion. Small shops sell at old MRP, while super shops offer discounts on older stock. Customers are confused and frustrated.
टॅग्स :GSTजीएसटीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरconsumerग्राहक