तुरीवर अळी, रबी पिकांची वाढच खुंटली
By | Updated: November 29, 2020 04:07 IST2020-11-29T04:07:02+5:302020-11-29T04:07:02+5:30
पाचोड : गेल्या आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि पडत असलेल्या धुक्यामुळे पाचोड परिसरात तुरीवर अळी पडत आहे. त्यातच ...

तुरीवर अळी, रबी पिकांची वाढच खुंटली
पाचोड : गेल्या आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि पडत असलेल्या धुक्यामुळे पाचोड परिसरात तुरीवर अळी पडत आहे. त्यातच रबी हंगामातील पिकांची वाढच खुंटली आहे. त्यामुळे खरीप हंगामदेखील धोक्यात आल्याने बळीराजा पुन्हा हवालदिल झाला आहे.
पाचोड व परिसरातील गावागावात यंदा पावसाळ्यात सुरुवातीपासून चांगला पाऊस पडला. त्यामुळे होता नव्हता पैसा शेतात टाकला होता. खरीप हंगामातील कपाशी, तूर, बाजरीचे पीकही जोमात आले. मात्र, पाचोड व परिसरातील सलग दोन दिवस अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे.
ढगाळ वातावरणाने पिकांवर प्रतिकूल परिणाम
शेतकऱ्यांनी रबी हंगामातील गहू, ज्वारीची पेरणी केली. ज्वारी, गहू, हरभरादेखील जोमात होता. मात्र, आठ ते दहा दिवसांपासून पाचोड परिसरात ढगाळ वातावरणामुळे गव्हाची, ज्वारीची वाढ खुंटली. तुरीवर अळ्या पडल्या आहेत. तुरी फुलाेऱ्यात आहेत. मात्र, फुलोरा गळून जात आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे फळबागादेखील धोक्यात आल्या आहेत.