‘गटबाजी चालणार नाही’
By Admin | Updated: August 23, 2014 00:46 IST2014-08-23T00:18:25+5:302014-08-23T00:46:35+5:30
हिंगोली : पदाचा मान व सन्मान करून काम करणाऱ्यांचीच शिवसेना असल्याचा खणखणीत इशारा हिंगोलीचे नवीन शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी आज बैठकीत दिला.

‘गटबाजी चालणार नाही’
हिंगोली : शिवसेनेत कुणी एक व्यक्ति म्हणजे सर्वकाही नाही. व्यक्तिमहात्म्यावर कोणी गटबाजी केलेली खपवून घेतली जाणार नाही. पदाचा मान व सन्मान करून काम करणाऱ्यांचीच शिवसेना असल्याचा खणखणीत इशारा हिंगोलीचे नवीन शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी आज बैठकीत दिला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बैठक घेतली. अंतर्गत गटबाजीमुळे हिंगोलीत लोकसभेला पत्कराव्या लागलेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सुनावलेले खडेबोल सर्वांसाठीच सूचक आहेत. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची कास धरून काम करण्याचे आवाहनही जाधव यांनी केले.
यावेळी जिल्हाप्रमुख संतोष बांगर, दिनकरराव देशमुख, कडुजी भवर, संतोष देवकर, अशोक नाईक, श्रीराम बांगर, दिलीप घुगे, बाजीराव सवंडकर, रामेश्वर शिंदे, रवींद्र सोनी, जयवंत गुठ्ठे, अशोक हरण, ओम देशमुख, शिवाजी कऱ्हाळे, मंगला कांबळे, आनंदराव जगताप आदींची उपस्थिती होती.