सामूहिक विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण

By Admin | Updated: April 23, 2016 23:48 IST2016-04-23T23:33:58+5:302016-04-23T23:48:38+5:30

जालना/परतूर : येथे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. विविध मंत्री, खासदार, आमदार व इतर मान्यवर शहरात येणार असल्याने

Group wedding preparations full | सामूहिक विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण

सामूहिक विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण


जालना/परतूर : येथे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. विविध मंत्री, खासदार, आमदार व इतर मान्यवर शहरात येणार असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
शहरातील जि. प. प्रशालेच्या मैदानावर सामूहिक विवाह सोहळ्यासाठी भव्य लग्न मंडप तसेच व्यासपीठाची उभारणी करण्यात आली आहे. भोजन, निवास, पाणी तसेच वऱ्हाडी मंडळींची शहरातील विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्याच्या दिवशी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन बससह इतर वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी विविध खात्यांचे सात ते आठ मंत्री उपस्थित राहणार आहेत.
याबरोबरच खासदार व आमदारही उपस्थित राहणार आहेत. या विवाह सोहळ्यात विविध जाती धर्मांचे मिळून ४६१ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. वधू- वरांना कपडे व इतर साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. एकूणच या भव्य अशा सोहळ्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. हा सोहळा पाहण्यासाठीही गर्दी होणार असल्याचे चित्र आहे.

Web Title: Group wedding preparations full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.