सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज
By Admin | Updated: April 22, 2016 00:25 IST2016-04-21T23:59:58+5:302016-04-22T00:25:57+5:30
जालना : शहरात नुकताच भाजपाच्या वतीने भव्य असा सामूहिक विवाह सोहाळ उत्साहात पार पडला. यात तब्बल ५५१ जोडपी विवाहबद्ध झाली.

सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज
जालना : शहरात नुकताच भाजपाच्या वतीने भव्य असा सामूहिक विवाह सोहाळ उत्साहात पार पडला. यात तब्बल ५५१ जोडपी विवाहबद्ध झाली. त्याअनुषंगाने सामूहिक विवाह सोहळे व्हावेत का? या विषयावर लोकमतने सर्व्हेक्षण करून वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यात ५० टक्के वाचकांनी सामूहिक विवाह सोहळे व्हावेत, असा कौल दिला.
लोकमतने प्रश्नावलीच्या माध्यमातून हे सर्व्हेक्षण केले. यात पर्यायी चार प्रश्न विचारण्यात आले. सामूहिक विवाह सोहळे व्हावेत का? या प्रश्नावर ५० टक्के जनता होय म्हणते. ३० टक्के नागरिकांना नाही असे वाटते तर २० टक्के नागरिकांना काहीच म्हणायचे नाही. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे खर्चात बचत होते का? या प्रश्नावर ४० टक्के म्हणतात बचत होते. तर ५० टक्के जनता म्हणते बचत होत नाही. १० टक्के जनता माहिती नाही असे उत्तर देते. ५० टक्के खर्चावर बोट ठेवत असली तरी अनेकांनी या उपक्रम चांगला असल्याचे म्हटले आहे. दुष्काळी पार्श्वभूमीवर सामूहिक विवाह सोहळे फायद्याचे आहेत का? ८० टक्के नागरिकांनी फायद्याचे सांगितले. १० टक्के जनता नाही म्हणते. तर १० टक्के जनतेला याबाबत काहीच माहीत नाही.
सामूहिक विवाह सोहळ्याबाबत जनजागृती गरजेची आहे का? यावर ७० टक्के जनतेने जनजागृती गरजेची असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
१५ टक्के म्हणतात जनजागृती गरजेची नाही. तर १५ टक्के जनता अनभिज्ञ आहे. एकूणच सामूहिक विवाह सोहळे ही संकल्पना चांगली असून, खर्च वाचतो, अनुदान मिळते, प्रमाणपत्र मिळते शिवाय भेटवस्तूही मिळतात असे अनेकांनी सांगून असे विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे सांगितले. वाढत्या महागाईच्या काळात गरीब जनतेला हा मोठा आधार असल्याचे काहीजण सांगतात.