गटसचिवाने ग्राहक मंचचा आदेश डावलला
By Admin | Updated: August 6, 2014 02:21 IST2014-08-06T01:29:22+5:302014-08-06T02:21:02+5:30
लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कानेगाव येथील एका शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कर्ज उचलल्या प्रकरणी ग्राहक तक्रार मंचने

गटसचिवाने ग्राहक मंचचा आदेश डावलला
लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कानेगाव येथील एका शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कर्ज उचलल्या प्रकरणी ग्राहक तक्रार मंचने संबधित गटसचिवास ३० दिवसांच्या आत पैसे भरण्याचे आदेश दिले होते़ मात्र गटसचिवाने पैसे न भरता आदेशाचे उल्लंघन केले़
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कानेगाव येथील शेतकरी प्रताप माणिकराव बंडले हे टिपराळ विकास कार्याकारी सोसायटीचे सदस्य आहेत़ त्यांच्या नावे खोटी सही करून संस्थेच्या गटसचिवाने परस्पर कर्ज उचलले़ शेतकरी बंडले यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेकडे तक्रार दिली़ त्यानुसार सहाय्यक निबंधकाने परस्पर कर्ज उचलले गेल्याचा निकाल दिला़ ग्राहक मंचनेही शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला़ ३० दिवसांत पैसे भरण्याचे आदेश गटसचिवांना दिले़ मात्र गटसचिवाने पैसे भरले नाहीत़ देवणी पोलिसांत या प्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार देण्यात आली़ मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही़ उलट शेतकऱ्यास धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे़
दरम्यान शेतकरी संघटनेने या प्रकरणाची दखल घेत पोलिस अधिक्षकांना मंगळवारी निवेदन दिले असून गटसचिवावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे़ निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांची स्वाक्षरी असून गुन्हा नोंद न केल्यास आंदोलच करण्याचा इशारा देण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)