कोल्हेनगरात चौघांकडून एका तरुणावर कटरने हल्ला
By Admin | Updated: January 24, 2017 22:36 IST2017-01-24T22:33:39+5:302017-01-24T22:36:33+5:30
लातूर : शहरातील कोल्हेनगर परिसरात अजय बालाजी पौळ (२०) या तरुणावर मागीण भांडणाची कुरापत काढून चौघांनी कटरने सोमवारी रात्री उशिरा हल्ला केला आहे.

कोल्हेनगरात चौघांकडून एका तरुणावर कटरने हल्ला
लातूर : शहरातील कोल्हेनगर परिसरात अजय बालाजी पौळ (२०) या तरुणावर मागीण भांडणाची कुरापत काढून चौघांनी कटरने सोमवारी रात्री उशिरा हल्ला केला आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मंगळवारी दुपारी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर शहरातील कोल्हेनगर परिसरात राहणाऱ्या किसन पिंपळे, महादू शिंदे, उद्घव कदम आणि निर्मला शिंदे या चार जणांनी अजय बालाजी पौळ याला संगनमत करुन, मागील भांडणाची कुरापत काढून सोमवारी रात्री उशिरा कटरने हल्ला केला. या हल्ल्यात बालाजी पौळ जखमी झाला आहे. यात त्याच्या कानावर, उजव्या हाताला, पाठीवर जबर जखम झाली आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन किसन पिंपळे, महादू शिंदे, उद्घव कदम, निर्मला शिंदे यांच्याविरुद्ध मंगळवारी दुपारी गुरनं ५५/२०१७ कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बालाजी पौळ आणि आरोपींमध्ये कुरबुर सुरू होती. यातूनच सोमवारी रात्री चौघांनी त्याला मारहाण केली. (प्रतिनिधी)