भुईमुगाचे भाव ४८०० रुपयावर
By Admin | Updated: August 24, 2014 01:16 IST2014-08-24T00:59:56+5:302014-08-24T01:16:04+5:30
नांदेड: बियाणाच्या तुलनेत गत महिनाभरापूर्वी बाजारात भुईमूगाच्या शेंगाचे भाव निम्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांना अल्पदरात विक्री करावी लागली होती.

भुईमुगाचे भाव ४८०० रुपयावर
नांदेड: बियाणाच्या तुलनेत गत महिनाभरापूर्वी बाजारात भुईमूगाच्या शेंगाचे भाव निम्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांना अल्पदरात विक्री करावी लागली होती. परंतु आजघडीला भुईमुगाच्या दरात प्रतिक्विंटल जवळपास १६०० रुपयांनी वाढ झाली असून भुईंमुगाचे दर ४८०० रुपयावर आले आहेत. यामुळे याचा परिणाम शेंगदाना तेलाच्या किंमतीही भडकल्या आहेत.
गत महिन्यात शेंगाचे भाव ३२०० ते ३२५० रुपयावर होते, परंतु ुुआजघडीला आवक नसल्याने दरात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी बियाणाची ६ ते ७ हजार रुपये क्विंटल दराने खरेदी केली असली तरी केवळ ३००० ते ३५०० रुपये क्विंटलप्रमाणे शेंगाची विक्री करावी लागली आहे. भुईमूगाची पेरणी करण्यासाठी बियाणे ६ ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करावी लागली होती.
तसेच यासाठी खत, औषध फवारणी, खूरपणी, निंदणी, कोळपणी आदी खर्च करावा लागाला. भुईमूगाची काढणी केल्यानंतर शेंगांना बाजारात केवळ ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळला. यामुळे भुईमूगाच्या पिकामध्ये शेतकरी तोट्यात आला आहे. यासाठी शासनाने उत्पादन खर्चाचा ताळमेळ लावून आधारभूत दर जाहिर केली तरच बाजारातील दर टिकून राहतील, अन्यथा येत्या काळात जिल्ह्यातून भुईमूगाचे पीक हद्दपार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यातील काही भागात रब्बी तसेच उन्हाळी ज्वारी, टाळकी व भुईमूगाची पेरणी केली जाते. पंरतु गेल्या काही वर्षापासून भुईमुगाचा उतारा घटला असून दरही अत्यल्प मिळत असल्याने बहुतांश शेतकरी याकडे पाठ फिरवत आहेत.
भुईमूगाच्या पेरणीसाठी बि-बियाणे, औषधीसाठी टाकलेला खर्चही निघाला नसल्याने उत्पादकांसमोर अडचण वाढली. मात्र आता वाढलेल्या दराचा फायदा व्यापाऱ्यांना मिळत आहे.सध्या नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीअतंर्गत शेतकऱ्यांकडील भुईमूगाची येणारी आवक अत्यल्प असून जास्तीत जास्त खरेदी-विक्री ही व्यापाऱ्यांकडे साठवून ठेवलेल्या शेंगाची होतांना दिसत आहे. (प्रतिनिधी)