भुईमुगास ३६०० भाव

By Admin | Updated: June 15, 2014 00:37 IST2014-06-15T00:30:13+5:302014-06-15T00:37:44+5:30

हिंगोली : मागील महिन्यापासून स्थिर असलेल्या भुईमुगाच्या दराने अचानक उडी घेतली. शनिवारी सकाळी अडीच हजारांपासून सुरू झालेला लिलाव उत्तरोत्तर वाढत जाऊन ३ हजार ६०० रूपयांपर्यंत पोहोचला

Groundnut 3600 price | भुईमुगास ३६०० भाव

भुईमुगास ३६०० भाव

हिंगोली : मागील महिन्यापासून स्थिर असलेल्या भुईमुगाच्या दराने अचानक उडी घेतली. शनिवारी सकाळी अडीच हजारांपासून सुरू झालेला लिलाव उत्तरोत्तर वाढत जाऊन ३ हजार ६०० रूपयांपर्यंत पोहोचला. भाववाढीची अपेक्षा ठेवून घरीच भुईमूग ठेवलेल्या उत्पादकांना याचा फायदा झाला. शिवाय यंदाच्या हंगामातील हा भाव सर्वोच्च असल्याचे उत्पादकांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात पेरा नगण्य असल्याने भूईमुगाचे उत्पादन कमी प्रमाणात होते. पाण्याची सुविधा असणाऱ्या उत्पादकांकडून भुईमुगाचा पेरा केला जातो. त्यातही हिवाळी भुर्ईमुगाच्या आगमनापासून उन्हाळी भुईमुगाचे प्रमाणही घटत गेले. कारण उन्हाळ्यात भरमसाठ पाणी देवूनही अपेक्षित उत्पादन निघत नाही. उत्पादन निघाले तरी भुईमुगाला रास्त भाव मिळत नाही. प्रतिवर्षीची ही स्थिती असल्याने उत्पादकांनी भुईमुगास दूर लोटल्याचे दिसते; परंतु काही प्रमाणात लागवड केलेल्या उत्पादकांनी भुईमुगास बाजार दाखविण्यास सुरूवात केली आहे. मागील महिनाभरापासून हिंगोली बाजार समितीत भुईमुगाची आवक होत आहे. पण पाऊस पडताच भुर्ईमुगाची आवक वाढली. कारण खरीप हंगामात लागणारे खत-बियाणे खरेदीसाठी भुर्ईमूग विकून पैैसा उभा करण्याचा उत्पादकांचा मानस आहे; मात्र भाव स्थिर असल्यामुळे घरीच ठेवलेल्या उत्पादकांना शनिवारी फायदा झाला. शनिवारी सकाळी २ हजार ४९० रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली. नेहमीपेक्षा लिलाव अधिक वाढत गेल्याने ३ हजार ६०० रूपयांपर्यंत कमाल दर गेला. पहिल्यांदाच शनिवारी भुईमुगाच्या दराने साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडला. राज्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत हिंगोली रास्तभाव मिळाल्याने उत्पादकांनी समाधान व्यक्त केले. हिंगोली सोबतच धुळे बाजार समितीत देखील ३ हजार ६५० रूपयांचा भाव होता. त्याखालोखाल शुक्रवारी परळी वैजनाथ येथील ३ हजार ९९ रूपयांचा कमाल भाव होता. याच दिवशी साक्री बाजारपेठेतही ३ हजार ५०० रूपयांपर्यंत भाव गेला होता. जिल्ह्याशेजारी नांदेड बाजार समितीत ३ हजार २५० रूपयांपर्यंत दर मिळाला.
मागील महिन्याभरापासून वाट पाहणाऱ्या उत्पादकांना उशिरा को होईना चांगला भाव मिळाला. पेरणीच्या तोंडावर वाढलेल्या दरांमुळे उत्पादकांना खत-बियाणे खरेदीसाठी फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)
हिंगोली जिल्ह्यात पेरा नगण्य असल्याने भुईमुगाचे उत्पादन कमी प्रमाणात होते.पाण्याची सुविधा असणाऱ्या उत्पादकांकडून भुईमुगाचा पेरा केला जातो.
गत महिनाभरापासून हिंगोली बाजार समितीत भुईमुगाची आवक होत आहे. पण पाऊस पडताच भुईमुगाची आवक वाढली आहे.

प्रमुख बाजार समित्यांचे भाव
कृउबा कमाल  किमान  उदगीर३ २००३०००
नांदेड३ २५०३०००
परळी  ३३९९२८००
कोटल  ३२५०२०००
अकलूज  ३२००३१५०
खामगाव  २९००२४५०  किनवट  ३२००३०००
धुळे  ३६००२०००
कोटल  ३२५०२०००
सक्री  २२००३५००
श्रीरामपूर  २०००२५००

Web Title: Groundnut 3600 price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.