सकल मारवाडी युवा मंचला ४ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:05 IST2017-08-07T00:05:35+5:302017-08-07T00:05:35+5:30

मारवाडी समाजातील १७ पोटजातींना एकजूट करणाºया सकल मारवाडी युवा मंचला उत्कृष्ट कार्याबद्दल ४ पुरस्कार मिळाले आहेत.

 Gross Marwadi Youth Forum Awards 4 Awards | सकल मारवाडी युवा मंचला ४ पुरस्कार

सकल मारवाडी युवा मंचला ४ पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मारवाडी समाजातील १७ पोटजातींना एकजूट करणाºया सकल मारवाडी युवा मंचला उत्कृष्ट कार्याबद्दल ४ पुरस्कार मिळाले
आहेत.
धुळे येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंचच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. औरंगाबादेतील सकल मारवाडी युवा मंचचे संजय मंत्री यांना सर्वश्रेष्ठ अध्यक्षाचा पुरस्कार, सर्वश्रेष्ठ शाखा, सर्वोत्तम प्रकल्प- रेन वॉटर हार्वेस्टिंग व काही महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या मारवाडी मिडटाऊन शाखेला विशिष्ट कार्यगौरव, असे चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. माजी राज्यमंत्री रमेश बंग व संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निकेश गुप्ता यांनी पुरस्कार दिला.
यासंदर्भात संजय मंत्री यांनी सांगितले की, समाजहितासाठी सकल मारवाडी युवा मंचने वर्षभरात जे उत्कृष्ट उपक्रम नियोजनबद्धपणे राबवून यशस्वी केले. सर्व पदाधिकारी व सर्व पोटजातीतील अध्यक्ष व समाजबांधवांच्या एकजुटीतूनच हे शक्य झाले आहे. या एकजुटीचाच गौरव पुरस्काररुपात झाला आहे. सोहळ्यात युवा मंचचे सध्याचे अध्यक्ष आशिष अग्रवाल, अमित भोमा, संतोष तिवारी, जगदीश उपाध्याय, मुकेश तिवारी, आशिष बजाज, संजय मंत्री, श्रीकांत उपाध्याय, मिडटाऊन शाखेच्या अध्यक्षा सुप्रिया सुराणा, ममता तिवारी, रिंकू उपाध्याय, आस्था तिवारी, भक्ती संकलेचा व दीपाली शिवाल यांची उपस्थिती होती.

Web Title:  Gross Marwadi Youth Forum Awards 4 Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.