महावीर जयंतीनिमित्त सकल
By Admin | Updated: April 1, 2015 01:04 IST2015-04-01T00:15:43+5:302015-04-01T01:04:02+5:30
औरंगाबाद : संपूर्ण देशासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या औरंगाबादेतील सकल जैन समाजातर्फे २ एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी करण्यात येणार आहे.

महावीर जयंतीनिमित्त सकल
औरंगाबाद : संपूर्ण देशासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या औरंगाबादेतील सकल जैन समाजातर्फे २ एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी करण्यात येणार आहे. विविध पंथातील लोक एका छताखाली एकत्र येऊन समाजाची एकता, एकजुटता पुन्हा एकदा दाखवून देणार आहेत. विविध भागांतील जैन मंदिरातील पालख्या मुख्य शोभायात्रेत सहभागी होणार आहेत.
पौराणिक व सामाजिक देखावे सादर करण्यात येणार आहेत. येथील उत्सवाची ख्याती एवढी आहे की, सहभागी होण्यासाठी हजारो कि.मी.चा प्रवास करून मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज व पीयूषसागरजी महाराज दुसऱ्यांदा शहरात आले आहेत, अशी माहिती भगवान महावीर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जिनदास मोगले यांनी पत्र परिषदेत दिली.
यावेळी सकल जैन समाजाचे महासचिव महावीर पाटणी, जी.एम. बोथरा, जन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष रवी मुगदिया, यंदाच्या समितीचे कोषाध्यक्ष मिठालाल कांकरिया, विनोद बोकाडिया, मुकेश साहुजी, भारती बागरेचा, करुणा साहुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तत्पूर्वी मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज, पीयूषसागरजी महाराज आदी साधू-साध्वीजी मांगलिक देणार आहेत. शोभायात्रेत पौराणिक व सामाजिक विषयांवर देखावे सादर करण्यात येणार आहेत. शोभायात्रा गुलमंडी, मछलीखडक, सिटीचौक, सराफा रोड मार्गे शहागंजातील गांधी पुतळा चौकात पोहोचणार
आहे. त्यानंतर जिल्हा परिषद मैदानावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता मुनीश्रींचा २७ वा दीक्षा महोत्सव राजाबाजारातील ही.कं.कासलीवाल महाविद्यालय प्रांगणात साजरा करण्यात येणार आहे. सर्वांनी शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन सकल जैन समाजाने केले.
समितीचे कार्याध्यक्ष मदनलाल आच्छा यांनी सांगितले की, १ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता अलर्ट ग्रुपतर्फे अल्पसंख्याक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. २ एप्रिल रोजी महावीर जयंतीनिमित्त सकाळी शहराच्या विविध भागांतून वाहन रॅली निघणार आहे.
७ वाजता महावीर स्तंभ येथे सकल जैन समाजाचे अध्यक्ष व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी ७.१५ वाजता उस्मानपुऱ्यातील उत्तमचंद ठोले दिगंबर जैन छात्रालयात व ७.३० वाजता गुरुगणेशनगर येथे धर्मध्वजारोहण करण्यात येणार आहे. समितीचे महासचिव वृषभ कासलीवाल यांनी सांगितले की, सकाळी ८ वाजता पैठणगेट येथून मुख्य शोभायात्रा निघणार आहे.