शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेव बोहल्यावर चढला अन् नवरीला आई-वडिलांनीच ठेवले डांबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 17:02 IST

दोघांनीही पळून जाऊन लग्न केले आहे, नातेवाईकांनी रीतसर लग्न लावून देतो म्हणून बोलावून घेतले आणि ....

वैजापूर (औरंगाबाद ) : लग्न म्हटले की धमाल, मौजमजा, मित्रमंडळी, नातेवाइकांतील आनंदाचा क्षण. लग्नाचा दिवस हा वधू-वरांच्या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव असतो. मात्र, बुधवारी शहरात आयोजित लग्न समारंभात नवरदेव व त्यांच्या नातेवाइकांना वेगळाच अनुभव आला. नवरीच्या आई-वडिलांनी चक्क मुलीला (वधूला) घरातच डांबून ठेवले. नवरदेवाला हळदीच्या अंगावर पोलीस ठाणे गाठावे लागले. रात्री उशिरापर्यंत यावर तोडगा काही निघाला नव्हता.

तालुक्यातील तिडी येथील एक युवक हा वैजापुरातील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्यावेळी त्याचे वर्गातील एका युवतीशी प्रेम जुळले. प्रेमाच्या आणाबाका घेत त्यांनी घरच्यांचा विरोध करून विवाह केला. दोघेही घराबाहेर पळून गेले. त्यानंतर त्यांनी रीतसर नोंदणी पद्धतीने विवाह केला. तोपर्यंत मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद वैजापूर पोलीस ठाण्यात केली. मात्र, दोघेही सज्ञान असल्याने नातेवाईक काही करू शकले नाही. मुला-मुलीने पळून जाऊन लग्न केल्याची खंत दोघांच्या आई-वडिलांना होती. समाजात व नातेवाइकांत बदनामी होईल. म्हणून त्यांनी समेट घडवून आणला. दोघांच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत रीतसर लग्न लावण्याचा निर्णय कुटुंबीयांकडून घेतला गेला. बुधवारी लग्नाची तारीख होती. दोन्ही कुटुंबीयांनी सर्व नातेवाइकांना आमंत्रण देऊन लग्नाला पाचारण केले. वैजापुरात विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले होते. सकाळपासूनच दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांची धावपळ सुरू होती. मित्र, सगेसोयरे, मामा, मावशी व मित्रमंडळी भेटवस्तूंसह लग्नाला हजर झाली. मंडप, जेवणाचीही जोरदार तयारी सुरू होती. पाहुणे मंडळी जेवणाचा आस्वाद घेत होते. नवरदेवालाही हळद लावून सजविण्यात आले होते. नवरदेवाची मिरवणूक काढून तो मंडपात आला. बोहल्यावर चढण्यासाठी तो सज्ज असतानाच भलतेच घडले. मुलीच्या आई-वडिलांनी चक्क मुलीला डांबून ठेवत लग्नास नकार दिला.

...अन् नवरदेवाने पोलीस ठाणे गाठले !नवरदेव बोहल्यावर चढला होता. काही वेळातच लग्न लागणार होते; परंतु वधूच्या आई-वडिलांनी तिला घराबाहेर पडूच दिले नाही. आम्हाला लग्न नाही करायचे, अशी भूमिका मुलीचे आई-वडील व नातेवाइकांनी घेतली. त्यामुळे हळद लावून बसलेल्या नवरदेवाच्या पायाखालची वाळू सरकली. आपण फसलो गेल्याचे नवरदेव व नातेवाइकांच्या लक्षात आले. त्यानंतर हळदीच्या अंगावरच नवरदेवाने नातेवाइकांसह पोलीस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत वऱ्हाडी मंडळींनी वैजापूर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. मात्र, पोलिसांनी हात झटकले. तसेच मुलीच्या आई-वडिलांनी मुलीला घराबाहेरच पडू दिले नाही. त्यामुळे काही नातेवाइकांनी घरी काढता पाय घेतला. रात्री उशिरापर्यंत या विवाहाबाबत तोडगा निघाला नव्हता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न