घृष्णेश्वराला आता फक्त बेलफूलच

By Admin | Updated: July 6, 2016 23:58 IST2016-07-06T23:54:08+5:302016-07-06T23:58:36+5:30

वेरूळ : वेरूळच्या प्रसिद्ध ज्योर्तिलिंग श्री घृष्णेश्वर मंदिर गाभाऱ्यात शिवलिंगावर बेल व फूल सोडून इतर वनस्पतींचा पाला वाहण्यास प्रशासनाने बुधवारी (दि.६) बंदी केली आहे.

Grishneshwar is now just Bellfool | घृष्णेश्वराला आता फक्त बेलफूलच

घृष्णेश्वराला आता फक्त बेलफूलच

वेरूळ : वेरूळच्या प्रसिद्ध ज्योर्तिलिंग श्री घृष्णेश्वर मंदिर गाभाऱ्यात शिवलिंगावर बेल व फूल सोडून इतर वनस्पतींचा पाला वाहण्यास प्रशासनाने बुधवारी (दि.६) बंदी केली आहे. पोलीस प्रशासन व भारतीय पुरातत्व विभागास अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
येथे येणाऱ्या भाविकांना बेल व फूल विक्रे ते इतर वनस्पतींचा पाला शिवलिंगाला वाहण्यासाठी विक्री करीत होते. त्यामुळे मंदिराची पवित्रता धोक्यात आली होती, तसेच वाहिला जाणारा हा पाला एकदा वाहिल्यानंतर भाविकांना मंदिराच्या बाहेर पुन्हा विकला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत मंदिरात होत असलेल्या अशुद्ध दुधाच्या वापराबाबत चर्चा करण्यात आली. भविकांकडून अशुद्ध दूध शिवलिंगावर वाहिले जाते. त्यामुळे दुर्गंधी पसरते. यासह इतर समस्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
उपविभागीय दंडाधिकारी राजीव नंदकर यांनी बाहेर दोन विक्रे त्यांकडून जप्त के लेल्या दुधाच्या पिशव्या अन्न व औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवायचा निर्णय घेतला आहे. अशुद्ध दूध वापरल्यामुळे होणाऱ्या परिणामाबाबत भारतीय पुरातत्व विभागाच्या (एएसआय) तज्ज्ञांची मते मागवण्यात आल्याचे राजीव नंदकर यांनी सांगितले. अशुद्ध दूध व इतर झाडांचा पाला वापराबाबत औरंगाबाद येथील डॉक्टर भांबरे यांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस तहसीलदार बालाजी शेवाळे, भारतीय पुरातत्व विभागाचे हेमंत हुकुरे, सहायक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड, घृष्णेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष दीपक शुक्ला गुरू, डॉ. भांबरे, हजारे, इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तक्रारींमुळे निर्णय
घृष्णेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगावर चंदन व सब्जा आणि इतर हिरवळ टाकण्याचा प्रघात पडला होता.
बेल व फूल वाहण्यास मान्यता आहे; परंतु या व्यतिरिक्त काही वनस्पती शिवलिंगावर टाकल्या जात असल्याच्या तक्रारी संस्थान व प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यामुळे ज्योतिर्लिंगावर परिणाम होण्याची शक्यता बळावली होती.
बेल आणि फू ल अर्पण करण्यास अनुमती राहणार आहे. तसेच दुग्ध व जलाभिषेकाच्या पूजा सुरू राहतील. दुग्धाभिषेकामध्ये चांगले दूध वापरले जावे. भेसळयुक्त दूध ज्योतिर्लिंगावर टाकले जाऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
४श्रावण महिन्यात घृष्णेश्वर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्या अनुषंगाने आतापासूनच बेल आणि फूल ज्योतिर्लिंगावर वापरण्याबाबत जनजागृती व्हावी. यासाठी मंगळवारी मंदिर संस्थान आणि प्रशासनात महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Grishneshwar is now just Bellfool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.