‘ग्रिड’ द्वारे १७६ गावांना मिळणार शुध्द पाणी

By Admin | Updated: April 15, 2017 00:33 IST2017-04-15T00:30:58+5:302017-04-15T00:33:35+5:30

परतूर: ‘ग्रिड’ शुध्द पाणी पुरवठा योजनेचे काम युध्द पातळीवर सुुरू असून या योजनेतून १७६ गावांना शुध्द पाणी मिळणार आहे.

'Grid' provides 176 villages with pure water | ‘ग्रिड’ द्वारे १७६ गावांना मिळणार शुध्द पाणी

‘ग्रिड’ द्वारे १७६ गावांना मिळणार शुध्द पाणी

परतूर: ‘ग्रिड’ शुध्द पाणी पुरवठा योजनेचे काम युध्द पातळीवर सुुरू असून या योजनेतून १७६ गावांना शुध्द पाणी मिळणार आहे.
परतूर- मंठा तालुक्यातील १७६ गावे या योजनेतून शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी जोडली जाणार आहेत. या योजनेचे ८० टक्के काम पावसाळयापूर्वी पूर्ण होणार आहे. या योजनेचे पाईप दबाईचे काम सुरू आहे. या योजनेचा मुख्य जलकुंभ निम्न दुधना प्रकल्पाजवळ आहे. परतूर, जयपूर, आष्टी रोडवर पाईप दाबण्याचे काम सुरू आहे. पाईप दाबण्याचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. १२ मोठे जलकुंभही बांधण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतातून जलवाहिनी जात असल्याने पेरणीपूर्वी हे काम होणे गरजेचे आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून ही योजना कार्यान्वीत झाली आहे. एकूणच या योजनेचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याने लवकरच या योजनेतून १७६ गावांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळेल, अशी ग्रामस्थांना आशा वाटते.
यासंदर्भात जि. प. सदस्य राहुल लोणीकर म्हणाले की, योजना पूर्ण झाल्यावर १७६ गावांचा पाणी प्रश्न सुटेल व शुध्द पाणी मिळणार आहे. ही योजना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून साकार होत आहे. २५ टक्के काम पूर्ण झाले. गावकऱ्यांना लवकरच शुध्द पाणी देण्याचा मानस असल्याचे लोणीकर यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक कृष्णा अरगडेसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: 'Grid' provides 176 villages with pure water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.