अभिवादनास उसळला भीमसागर

By Admin | Updated: April 15, 2016 00:36 IST2016-04-15T00:04:23+5:302016-04-15T00:36:32+5:30

बीड : ‘जय भीम’चा जयघोष, निळे झेंडे, नीळची उधळण व बेधुुंद झालेले अबालवृद्ध अशा सळसळत्या उत्साहात गुरुवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १२५ व्या जयंतीनिमित्त मानवंदना देण्यात आली.

Greetings to Uslala Bhimasagar | अभिवादनास उसळला भीमसागर

अभिवादनास उसळला भीमसागर

बीड : ‘जय भीम’चा जयघोष, निळे झेंडे, नीळची उधळण व बेधुुंद झालेले अबालवृद्ध अशा सळसळत्या उत्साहात गुरुवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १२५ व्या जयंतीनिमित्त मानवंदना देण्यात आली. शहरात डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादनासाठी अक्षरश: जनसागर उसळला होता. ठिकठिकाणच्या मिरवणुकांनी संपूर्ण आसमंत दणाणून गेला. तथापि, पोलीस प्रशासनाने जागोजागी नाकाबंदी करुन शहरात येणारे डीजे बाहेरच रोखून जप्त केले. त्यामुळे तरुणाईचा हिरमोड झाला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बुधवारी रात्री साडेअकरा वाजता समता ज्योत निघाली. यावेळी अधीक्षक अनिल पारसकर यांनी समता ज्योत हाती घेतली. बशीरगंज, कारंजा, माळीवेस, सुभाष रोडमार्गे समता ज्योत मध्यरात्री १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दाखल झाली. तेथे फटाक्यांची आतषबाजी व रोषणाई करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माचे हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले. गुरुवारी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून धम्मरूलीला प्रारंभ झाला. यावेळी विविध सामाजिक कार्यकर्ते, महिला- पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचल्यावर अभिवादन सभा घेण्यात यावेळी पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. भन्ते पट्टीसेन यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन कार्यक्रमांना सुरुवात झाली.
यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, उपअधीक्षक गणेश गावडे, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, राकॉ जिल्हाध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, माजी आ. राजेंद्र जगताप, प्रा. सुशीला मोराळे, प्रा. सर्जेराव काळे, अशोक हिंगे, जि.प.सभापती संदीप क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के, दिलीप गोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, डॉ. जितेंद्र ओव्हाळ, दिलीप धूत, दिलीप भोसले, अजय सवाई, अ‍ॅड. सर्जेराव तांदळे, विक्रांत हजारी, अजिंक्य चांदणे, अ‍ॅड. सुभाष राऊत, संदीप उपरे, प्रा. प्रदीप रोडे, अमरसिंह ढाका, शीतलकुमार सुकाळे, एस. टी. गायकवाड, शुभम धूत उपस्थित होते.
रात्री साडेसात वाजेनंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मुख्य मिरवणुकांमध्ये इतर उत्सव समितीच्या मिरवणुकाही सहभागी झाल्या. जालना रोड, सुभाष रोडमार्गे मिरवणुका डॉ. आंंबेडकर पुतळ्याच्या दिशेने निघाल्या. यावेळी तरूणाईसह ठिकठिकाणी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत झाले. (प्रतिनिधी)
सकाळपासून अभिवादनासाठी नागरिकांचे लोंढे डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. गर्दीने पुतळा परिसर फुलून गेला होता. दिवसभर अभिवादनासाठी नागरिकांची गर्दी होती. सायंकाळी मिरवणुकांना प्रारंभ होण्यापूर्वीच डीजे जप्तची कारवाई झाल्याने आवाजाचा दणदणाट नव्हता. त्यामुळे मिरवणुका निघण्यास विलंब झाला.
सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. आंबेडकरांची प्रतीमा मिरवणूक विद्युत रोषणाई व फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथातून काढण्यात आली. यावेळी अबालवृद्ध, महिला मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या.
डीजेसाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे ढोलताशा, डफ, तुतारी, पिपाणी अशा पारंपरिक वाद्यवृंदांसह दिमाखात मिरवणुका निघाल्या.

Web Title: Greetings to Uslala Bhimasagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.