स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:05 IST2021-03-19T04:05:57+5:302021-03-19T04:05:57+5:30

दरवर्षी वेरूळ ग्रामस्थ व सोहळा समितीच्या वतीने ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते; परंतु कोरोनाचे संकट पाहता हा ...

Greetings to Swarajya Sankalpak Shahaji Raje Bhosale | स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना अभिवादन

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना अभिवादन

दरवर्षी वेरूळ ग्रामस्थ व सोहळा समितीच्या वतीने ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते; परंतु कोरोनाचे संकट पाहता हा जयंती सोहळा यंदा रद्द करण्याचा निर्णय समस्त वेरूळ ग्रामस्थ व जयंती सोहळा समितीच्या वतीने घेण्यात आला; तर जयंतीदिनी भोसले स्मारकावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जयंतीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सवही साजरा करण्यात आला.

गुरुवारी अभिवादनासाठी मच्छिंद्र देवकर, अनिल मिसाळ, विजू भालेराव, किरण काळे, सुखदेव ठेंगडे, संजय श्रीखंडे, गणपत म्हस्के, राजू चव्हाण, किशोर चव्हाण, मिलिंद पाटील, कारभारी ढिवरे, शंकर रोडगे, सागर पाटील, सागर मातकर, सौरव वरकड, गणेशसिंह हजारी, शंकर मिसाळ, अजय गायकवाड, सचिन जाधव, सुनील लोखंडे, एकनाथ जाधव, राहुल निकुंभ, अरुण आधाणे, शंकरराव आधाणे, बाबासाहेब चव्हाण यांची उपस्थिती होती.

फोटो : खुलताबाद येथे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना अभिवादन करण्यासाठी जमलेले सोहळा समितीचे पदाधिकारी.

Web Title: Greetings to Swarajya Sankalpak Shahaji Raje Bhosale