शिवसेना प्रमुखांना वाॅर्डावाॅर्डांत अभिवादन : अमरप्रीत चौकात जत्थेच्या जत्थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:03 IST2021-01-25T04:03:21+5:302021-01-25T04:03:21+5:30

अमरप्रीत चौकात शिवसेना प्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांचे जत्थेच्या जत्थे येत होते. जिल्हा प्रमुख व आमदार अंबादास दानवे यांनी याठिकाणी ...

Greetings to Shiv Sena chief in Ward Ward: Battalions in Amarpreet Chowk! | शिवसेना प्रमुखांना वाॅर्डावाॅर्डांत अभिवादन : अमरप्रीत चौकात जत्थेच्या जत्थे!

शिवसेना प्रमुखांना वाॅर्डावाॅर्डांत अभिवादन : अमरप्रीत चौकात जत्थेच्या जत्थे!

अमरप्रीत चौकात शिवसेना प्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांचे जत्थेच्या जत्थे येत होते.

जिल्हा प्रमुख व आमदार अंबादास दानवे यांनी याठिकाणी पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

शिवसेना प्रमुखांनी मराठी मातीसाठीचा जागवलेला स्वाभिमान व हिंदुत्वाची प्रेरणा कुणीही विसरू शकत नाही. या शहराची जनता तर शिवसेना प्रमुखांवर प्रेम करते व त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते, असे उद्गार यावेळी दानवे यांनी काढले. बाळासाहेबांमुळेच आज जिल्ह्यात दोन मंत्री, पाच आमदार, जिल्हा परिषद व इतर संस्था ताब्यात आहेत, हेही त्यांनी नमूद केले.

यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, विकास जैन, गिरजाराम हाळनोर, आनंद तांदूळवाडीकर, विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, राजू वैद्य, कला ओझा, सुनीता आऊलवार, सुनीता देव, अंजली मांडवकर, मीरा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. ते शिवसेना प्रमुखांचा जयजयकार करीत होते.

Web Title: Greetings to Shiv Sena chief in Ward Ward: Battalions in Amarpreet Chowk!