महामानवाला अभिवादन

By Admin | Updated: December 7, 2015 01:00 IST2015-12-07T00:43:06+5:302015-12-07T01:00:49+5:30

बीड: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले.

Greetings of the great almighty | महामानवाला अभिवादन

महामानवाला अभिवादन


बीड: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. शहरातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ हजारोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.
रविवारी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून धम्मरॅलीला प्रारंभ झाला. भारतीय बौद्ध महासभा व पंचशील नगरच्यावतीने रॅली काढण्यात आली होती. या दोन्ही रॅली कारंजा, धोंडीपुरा, माळीवेस मार्गे रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दाखल झाली. या ठिकाणी त्रिशरण पंचशील ग्रहण करीत सामुहीक बुद्ध वंदना झाली. ध्वजारोहन इंजि. बी.डी. साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर २२ प्रतिज्ञांची शपथ सदाशिव कांबळे यांनी दिली. यावेळी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी भगवान कांडेकर, अ‍ॅड. सुरेश वडमारे, सूर्यकांत जोगदंड, मच्छिंद्र डोंगरे, मनीषा तोकले, अशोक तांगडे, राहुल सवाई, कैलास वीर, अ‍ॅड. अविनाश गंडले, तत्वशील कांबळे, रवींद्र गोदाम, अ‍ॅड. सिद्धार्थ शिंदे, अनिल डोळसे, अभय मगरे, गंगाधर डिगांबरे, रेवती ओव्हाळ, शीला वाघमारे, आम्रपाली जाधव, अहिल्या गायकवाड यांच्यासह हजारो अनुयायांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)

Web Title: Greetings of the great almighty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.