छत्रपती संभाजीराजे यांना अभिवादन
By Admin | Updated: May 15, 2014 00:02 IST2014-05-14T23:04:18+5:302014-05-15T00:02:33+5:30
लातूर : छत्रपती संभाजी राजे यांची जयंती बुधवारी लातूर शहर व जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली़.

छत्रपती संभाजीराजे यांना अभिवादन
लातूर : छत्रपती संभाजी राजे यांची जयंती बुधवारी लातूर शहर व जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली़ जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूकही बुधवारी काढण्यात आली़ शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने संभाजीराजेंना अभिवादन करण्यात आले़ जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरासह सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते़ धर्मवीर संघटनेच्या वतीने सकाळी गंजगोलाईतील जगदंबामातेला दुग्धाभिषेक करुन संस्थापक अध्यक्ष राहुल अंधारे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली़ तसेच यानिमित्त शिवाजी चौकात रक्तदान शिबीर घेण्यात आले़ उद्घाटन तथागत गौतम बुद्ध व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाले़ शिबिरात १०१ जणांनी रक्तदान केले़ यावेळी बाबूअप्पा बावगे, गणेश शास्त्री, शंशीपंकज मधुकर, अॅड़विजय सलगरे, विक्रम मदने, प्रशांत बावगे, डॉ़उमांकात जाधव यांच्यासह शेकडो संभाजीराजे प्रेमींची उपस्थिती होती़ संभाजी सेनेच्या वतीने संपर्क कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले़ छत्रपती संभाजी महाराज उद्यान लातुरात व्हावे, यासाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला़ कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष भगवान माकणे, अरुण शिंदे, केशव गंभीरे, अॅड़वैजनाथ सूर्यवंशी, आकाश पाटील, सुजीत भोसले, सचिन जाधव, हर्षल गंभीरे, दिनेश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़ वीर भगतसिंह परिषदेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्राग़णेश बेळंबे यांच्या व्याख्यान घेण्यात आले़ उद्घाटन बुद्धवंदना घेऊन व संभाजीराजेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन झाले़ अध्यक्षस्थानी रामदास कांबळे होते़ शिवाजी सावंत, प्रा़विश्वनाथ आल्टे, प्रा़विनोद चव्हाण, अॅड़राहुल गायकवाड, श्रीनिवास बडूरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी बेळंबे म्हणाले, मातृभूमीसाठी बलिदान देणारे संभाजी महाराज तरुणांसाठी क्रांतीची प्रेरणा ठरले आहेत़ त्यांनी बुद्धांना अभिप्रेत असणारी समता आपल्या स्वराज्यात प्रस्थापित केली होती़ सूत्रसंचालन सचिन साळुंके यांनी केले़ आभार कृष्णा शिंदे यांनी मानले़ मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले़ यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड़धनंजय भिसे, अॅड़महादेव चापुले आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)