शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दिलासा ! कोरोना टेस्ट, ट्रॅकिंग जास्त, सुदैवाने रुग्ण कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 13:06 IST

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी १ हजार ८५० लोकांची तपासणी करण्यात आली; परंतु त्यात केवळ ३६ जण कोरोनाबाधित आढळले.

ठळक मुद्देशहरात रोज २ हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या होतात  एका पाॅझिटिव्ह रुग्णामागे किमान १५ जणांची तपासणी

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्ण घटल्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दररोज किमान २ हजार चाचण्या होत आहेत. एका पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील किमान १५ लोकांची तपासणी केली जात आहे. टेस्ट आणि ट्रॅकिंगचे प्रमाण जास्त असूनही कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले.

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी १ हजार ८५० लोकांची तपासणी करण्यात आली; परंतु त्यात केवळ ३६ जण कोरोनाबाधित आढळले. त्यानुसार रविवारी जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट अवघा १.९५ टक्के एवढा राहिला; परंतु ही एका दिवसाची स्थिती नाही. औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून रोज पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी ही ५० च्या खालीच राहिली आहे. चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्ण कमी होत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. मात्र, कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झालेले नाही, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. रोज २ ते ३ हजारांच्या घरात कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. दुसरीकडे, कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण बोटावर मोजता येईल एवढेच आहे.

ग्रामीण भागात तिप्पट रुग्णशहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रोज जवळपास तिप्पट कोरोना रुग्णांची भर पडत आहे. शहरात रविवारी ९ रुग्णांची वाढ झाली, त्याउलट ग्रामीण भागात २७ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळेच शहरापेक्षा ग्रामीण भागात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. मात्र, याकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष जात नसल्याची स्थिती आहे.

हाय रिस्क लोकांचा शोधकोरोना रुग्णाचे निदान झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील हाय रिस्क लोकांची चाचणी केली जाते. एका पाॅझिटिव्ह रुग्णामागे किमान १५ ते २० जणांची तपासणी होत आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण कुठेही कमी झालेले नाही. रुग्ण कमी प्रमाणात सापडत आहेत. कोणाला लक्षणे जाणवत असतील, तर त्यांनी स्वत:हून तपासणी करून घेतली पाहिजे.- डाॅ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

शहरातील कोरोना तपासणी आणि रुग्णतारीख-----चाचण्या------रुग्ण२७ जुलै---२२७३-----१०२८ जुलै----२६९४-----११२९ जुलै ----२३९८----- ५३० जुलै ----२८६९------१२३१ जुलै----- २१२१-----१११ ऑगस्ट-----१३५३-----९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका