अडीच कोटींचे पालिकांना अनुदान
By Admin | Updated: November 8, 2015 23:36 IST2015-11-08T23:24:04+5:302015-11-08T23:36:02+5:30
जालना : नगर पालिकांचा जकात कर व महागाई भत्ता रद्द केल्यामुळे त्या ऐवजी पालिकांना सहाय्यक अनुदान वितरित करण्यात येते.

अडीच कोटींचे पालिकांना अनुदान
जालना : नगर पालिकांचा जकात कर व महागाई भत्ता रद्द केल्यामुळे त्या ऐवजी पालिकांना सहाय्यक अनुदान वितरित करण्यात येते. जिल्ह्यातील जालना, भोकरदन, परतूर व अंबड या चार पालिकांसाठी २ कोटी ४४ लाख ८८ हजार ९३४ रूपये नोव्हेंबरचे सहाय्यक अनुदान शासनाने एका निर्णयानुसार मंजूर केले असून, ते जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्र्द करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व नगर पालिकांसाठी सन २०१५- १६ साठी १२०० कोटी रूपयांचा निधी अर्थ संकल्पित करण्यात आलेला आहे. त्यापैकी ७० टक्के निधी ८४० कोटी रूपये वितरीत करण्यात आलेला आहे. उर्वरित ३० टक्के वित्त विभागाने ३६० कोटी रूपये अर्थसंकल्प प्रणालीवर उपलब्ध करून दिले आहे. सदर निधीपैकी १०५ कोटी ५० लाख ७५ हजार २६७ रूपयांचा माहे नोव्हेंबर महिन्याचे अनुदान सर्व नगर पालिकांना वितरीत करण्यात आले आहे. त्यात जालना पालिकेला १ कोटी ९९ लाख ३५ हजार ६६७, अंबड १८ लाखख ७६ हजार ६९२, भोकरदन १० लाख ६१ हजार ६८३, परतूर १६ लाख १४ हजार ८९२ रूपयांचे अनुदान असे एकुण चारही पालिकांना २ कोटी४४ लाख ८८ हजार ९३४ रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
जकात कर व महागाई भत्ता रद्द करण्यात आल्याने त्याऐवजी नगर परिषदेना सहायक अनुदान वितरीत करण्यात येत आहे. राज्यातील सर्व नगर पालिकांसाठी माहे नोव्हेंबर २०१५ चे १०५ कोटी ५० लाख ७५ हजार २६७ ऐवढे अनुदान वितरीत करण्यास शासनाने ५ नोव्हेबर रोजी एका शासननिर्णयानुसार मंजूरी दिली आहे. जालना जिल्ह्यातील चार नगर पालिकांपैकी जालना पालिकेला सर्वाधिक म्हणजे १ कोटी ९९ लाख ३५ हजारांचे अनुदान मंजूर झाले आहे.