ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:05 IST2021-03-28T04:05:12+5:302021-03-28T04:05:12+5:30
जामिनास विरोध करताना सरकारी वकील एन.टी. भगत यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की अपील पहिल्यांदाच सुनावणीस आले ...

ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
जामिनास विरोध करताना सरकारी वकील एन.टी. भगत यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की अपील पहिल्यांदाच सुनावणीस आले आहे. अपिलार्थीचा जामीन अर्ज नामंजूर करताना सत्र न्यायालयाने सविस्तर आदेश दिला आहे. सकृत दर्शनी गुन्हा घडल्याचे निष्पन्न होते. अपिलार्थीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती त्यांनी केली.
संतोष कुलकर्णी यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, कुलकर्णी हे काँग्रेस पक्षाचे असून तक्रारदार व साक्षीदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. येत्या ६ महिन्यात नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे कुलकर्णी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी राजकीय विरोधातून तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटना ९ फेब्रुवारी २०२१ ला घडली असून तक्रार ११ फेब्रुवारीला उशिरा देण्यात आली आहे. सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. ॲड. हर्षद पाडळकर यांच्याकरिता ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.