शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीचा 'रॉयल' थाट! छ. संभाजीनगरमध्ये हेलिकॉप्टरमधून महाराजांच्या स्मारकांवर पुष्पवृष्टी

By बापू सोळुंके | Updated: February 19, 2026 19:46 IST

हेलिकॉप्टरमधून शिवस्मारकांवर पुष्पवृष्टी करत अभिवादन होताच शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी शहरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. नवीन छत्रपती संभाजीनगर गणेश महासंघाच्या शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने यंदा शहरातील प्रमुख शिवस्मारकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. आकाशातून होणारा हा फुलांचा वर्षाव आणि शिवरायांचा जयघोष यामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

महत्त्वाच्या चौकात पुष्पवृष्टीगुरुवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास या भव्य सोहळ्याला प्रारंभ झाला. खासदार संदीपान भुमरे, उत्सव समितीचे संस्थापक बबनराव डिडोरे आणि विद्यमान अध्यक्ष ज्योतिराम पाटील यांनी स्वतः हेलिकॉप्टरमध्ये बसून शिवरायांना अभिवादन केले. जयभवानीनगर चौक, पुंडलिकनगर, सिडको अविष्कार कॉलनी आणि शहरातील मुख्य केंद्र असलेल्या क्रांतीचौक येथील छत्रपतींच्या पुतळ्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली.

क्रांतीचौकात शिवप्रेमींचा जल्लोषविशेषतः क्रांतीचौक येथे सकाळी ११:३० ते ११:४८ या वेळेत जेव्हा हेलिकॉप्टरने घिरट्या घालत पुष्पवृष्टी केली, तेव्हा उपस्थित हजारो शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला. "छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आकाशातून पडणाऱ्या फुलांच्या पाकळ्या आपल्या अंगावर घेण्यासाठी आणि हा क्षण मोबाईलमध्ये टिपण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

विविध कार्यक्रमांची रेलचेलशहरातील विविध सार्वजनिक शिवजयंती उत्सव समित्यांच्या वतीनेही यंदा सामाजिक उपक्रम, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हेलिकॉप्टरमधून झालेली ही पुष्पवृष्टी यंदाच्या शिवजयंतीचे मुख्य आकर्षण ठरली.

English
हिंदी सारांश
Web Title : Shiv Jayanti Celebrated Royally: Flowers Showered on Shivaji Memorials by Helicopter

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar celebrated Shiv Jayanti with fervor. A helicopter showered flowers on Shivaji memorials, creating a spectacle. Enthusiasts rejoiced at Kranti Chowk. Various cultural and social programs were also organized, but the aerial flower shower became the highlight.
टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर