शिवाचार्यांची भव्य मिरवणूक
By Admin | Updated: January 28, 2017 23:49 IST2017-01-28T23:48:13+5:302017-01-28T23:49:29+5:30
परळी : श्री प्रभू वैद्यनाथाच्या महारुद्राभिषेक सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या ११ शिवाचार्यांची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली.

शिवाचार्यांची भव्य मिरवणूक
परळी : श्री प्रभू वैद्यनाथाच्या महारुद्राभिषेक सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या ११ शिवाचार्यांची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली.
वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट, वीरशैव लिंगायत समाज, ओम पंचाक्षर माहेश्वर जंगम पौरोहित्य मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीमध्ये नगराध्यक्षा सरोजनी हालगे, उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सचिव राजेश देशमुख, विजयकुमार मेनकुदळे, बापूसाहेब देशमुख, नीलकंठ पुजारी, दत्ताप्पा ईटके, चंद्रशेखर स्वामी उपस्थित होते. शिवाचार्यांनी वीरशैव लिंगायत समाजाचे महत्त्व यावेळी सांगितले. (वार्ताहर)