मुस्लिम बांधवांचा भव्य मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:56 IST2017-09-16T00:56:03+5:302017-09-16T00:56:03+5:30
मुस्लिम समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मेहाराजूल मशिदीपासून जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात आला. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिम व हिंदूंवर होणारे अत्याचार तसेच भारतातही अल्पसंख्यांकांवर गोवंशाच्या नावावर होणारे हल्ले व पुरोगामी विचारवंतांवर होणारे हल्ले थांबविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

मुस्लिम बांधवांचा भव्य मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मुस्लिम समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मेहाराजूल मशिदीपासून जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात आला. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिम व हिंदूंवर होणारे अत्याचार तसेच भारतातही अल्पसंख्यांकांवर गोवंशाच्या नावावर होणारे हल्ले व पुरोगामी विचारवंतांवर होणारे हल्ले थांबविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
मागील काही दिवसांपासून म्यानमारमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात रोहिंग्या मुस्लिम व हिंदू या अल्पसंख्यांकांना मारले जात आहे. अत्याचार केले जात आहे. पवित्र धार्मिक स्थळे, शाळाही यात लक्ष्य केल्या जात आहेत. या सर्व बाबी मानवाधिकाराचे हनन करणाºया आहेत. त्यामुळे हे प्रकार थांबले पाहिजे, अशी मागणी जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात केली आहे. मुस्लिम बांधवांनी यानिमित्त बंदही पाळला. म्यानमारप्रमाणेच भारतातही काही मंडळी वातावरण दूषित करीत आहे. त्याचाच परिणाम म्हणून पुरोगामी विचारसरणीच्या नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश आदींच्या हत्या झाल्या आहेत. त्यांचे विचार संपविण्याचा हा प्रयत्न विशिष्ट विचाराच्या लोकांनीच केला आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात अशा अशोभनिय घटना घडत आहेत. असे प्रकार थांबविण्याची मागणी केली. तसेच मुस्लिम समाजाला १५ टक्के आरक्षण देण्याची मागणीही केली.
देण्यात आलेल्या या निवेदनावर मुफ्ती शकीलसाब, जुनेदुर रहेमान मौलाना, शेख साजीद शेख खुर्शिद, स.इस्माईल पप्पू, मोईन शेख खयुम, अतिर्खुरहेमान, अमिरोद्दिन रजवी, मौलाना सम्मी हनिफ तांबोळी, मोईन खान, अ.हकीम बागवान, गौस तांबोली, निसारभाई आदींची नावे आहेत.