ग्रामसेवकास मारहाण
By Admin | Updated: July 19, 2014 00:39 IST2014-07-19T00:19:43+5:302014-07-19T00:39:44+5:30
पाथरी: घरकुलाचे प्रस्ताव आणि एफएसडीच्या धनादेशाच्या कारणावरुन ग्रामसेवक आर.पी. जाधव आणि पं. स. सदस्य लक्ष्मण दुगाने यांच्यामध्ये वादावादी झाली.

ग्रामसेवकास मारहाण
पाथरी: घरकुलाचे प्रस्ताव आणि एफएसडीच्या धनादेशाच्या कारणावरुन ग्रामसेवक आर.पी. जाधव आणि पं. स. सदस्य लक्ष्मण दुगाने यांच्यामध्ये वादावादी झाली. यात पं. स. सदस्याने ग्रामसेवकास बेदम मारहाण केल्याची घटना १८ जुलै रोजी दुपारी घडली.
लिंबा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आर.पी.जाधव आणि लिंबा येथील रहिवाशी पं.स.सदस्य लक्ष्मण दुगाने हे दोघे दुपारी पं. स.आवारामध्ये भेटले असता एकमेकांमध्ये वाद झाला. यावेळी ग्रामसेवकास पं.स.सदस्याने बेदम चोप दिला. या घटनेनंतर ग्रामसेवक आर.पी.जाधव यांनी पाथरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पं.स. सदस्याने घरकुलाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी माझ्या परस्पर का केली आणि एफएसडीच्या धनादेशावर स्वाक्षरी का होत नाही म्हणून आपल्याला मारहाण केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पंचायत समितीस्तरावरील ग्रा.पं.मध्ये केलेल्या कामाची एफएसडीची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतरही ग्रामसेवकाने ती रक्कम देण्यास पैशाची मागणी केली म्हणून हा प्रकार घडल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण दुगाने यांनी दिली. (वार्ताहर)