‘त्या’ ग्रामसेवकास घातले पाठीशी!

By Admin | Updated: June 19, 2014 00:17 IST2014-06-18T23:42:20+5:302014-06-19T00:17:19+5:30

बीड:वडवणी येथील तत्कालिन ग्रामसेवकावर विकासनिधीत अपहाराचा ठपका असतानाही त्यांना अधिकाऱ्यांकडून पाठीशी घातले जात आहे़

'That' Gramsevak was behind! | ‘त्या’ ग्रामसेवकास घातले पाठीशी!

‘त्या’ ग्रामसेवकास घातले पाठीशी!

बीड:वडवणी येथील तत्कालिन ग्रामसेवकावर विकासनिधीत अपहाराचा ठपका असतानाही त्यांना अधिकाऱ्यांकडून पाठीशी घातले जात आहे़ कारवाईला मुहूर्त मिळत नसल्याने कमालीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे़
वडवणी ग्रामपंचायतीतील तत्कालिन ग्रामसेवक व्ही़ आऱ डोंगरे यांच्यावर विकासनिधीत अपहार केल्याचा ठपका गटविकास अधिकारी सी़ एम़ ढोकणे यांनी ठेवला आहे़ ग्रामसेवक डोंगरे यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यातील १४ लाख ४ हजार ६०७ रुपये इतकी रक्कम परस्पर उचलल्याचे चौकशीत समोर आले होते़ परंतु सीईओ राजीव जवळेकर यांनी डोंगरेंची केवळ ५०० रुपयांची वार्षिक वेतनवाढ रोखली़ वर्षभरानंतर डोंगरे यांनी १७ लाख रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण पुढे आले़ त्याचा चौकशी अहवालही सीईओंच्या टेबलवर धूळ खात आहे़ हे प्रकरण ‘लोकमत’ ने पुढे आणले होते़ मात्र, अद्याप कारवाई न झाल्याने डोंगरेंना वाचविण्यामागे नेमका हेतू काय? असा सवाल उपस्थित होत आहे़ गटविकास अधिकारी ढोकणे देखील हतबल आहेत.(प्रतिनिधी)
प्रस्ताव पाठविला
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नईमोद्दीन कुरेशी यांनी सांगितले, ग्रामसेवक डोंगरेंवर निश्चितपणे कारवाई होईल़ त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव यापूर्वीच पाठविला होता; परंतु कारवाई झाली नाही़ आता निलंबनाचा प्रस्ताव नव्याने सीईओंकडे पाठविला असल्याचे ते म्हणाले़

Web Title: 'That' Gramsevak was behind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.