ग्रामसेवकाने परस्पर पाच लाख उचलले?
By Admin | Updated: January 10, 2017 00:02 IST2017-01-10T00:01:09+5:302017-01-10T00:02:44+5:30
तीर्थपुरी : ५ लाख १७ हजार रुपये ग्रामसेवकांनी सरपंचाची बनावट सही करून उचलले असल्याची तक्रार आहे.

ग्रामसेवकाने परस्पर पाच लाख उचलले?
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील दैठणा खु. येथील ६ शेतकऱ्यांचे एमआरईजीएस अंतर्गत विहिरीचे काम पूर्ण केल्यावर कुशल पेमेंट ग्रा.पं.च्या खात्यावर जमा करण्यात आलेले ५ लाख १७ हजार रुपये ग्रामसेवकांनी सरपंचाची बनावट सही करून तीर्थपुरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून परस्पर उचलले असल्याची तक्रार लाभार्थी व सरपंच यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दैठणा येथील शेतकरी केशव शेषराव बुलबुले, सरस्वती पांडुरंग बुलबुले, वसंत अर्जुन बुलबुले, अनिरूद्ध शामराव बुलबुले, विरेंद्र नारायण बुलबुले, दत्ता रामभाऊ खेत्रे यांना मग्रारोहयो अंतर्गत विहिरी मंजूर झाल्या होत्या. सदर प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सरपंच सुलोचना राजेंद्र परदेशी यांनी केली आहे.