समुद्रवाणीचे ग्रामसेवक गजाआड

By Admin | Updated: August 17, 2014 01:21 IST2014-08-17T00:51:49+5:302014-08-17T01:21:42+5:30

उस्मानाबाद : घराच्या जागेत घेतलेल्या बोअरची नोंद आठ अ ला घेवून तसा आठ अ देण्यासाठी २५० रूपयांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई

Gramsevak Gajahad of the city | समुद्रवाणीचे ग्रामसेवक गजाआड

समुद्रवाणीचे ग्रामसेवक गजाआड

समुद्रवाणीचे ग्रामसेवक गजाआड


उस्मानाबाद : घराच्या जागेत घेतलेल्या बोअरची नोंद आठ अ ला घेवून तसा आठ अ देण्यासाठी २५० रूपयांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई शनिवारी दुपारी समुद्रवाणी येथे करण्यात आली़
पोलिसांनी सांगितले की, उस्मानाबाद झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत तहसील कार्यालयामार्फत समुद्रवाणी येथील तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावाने घरबांधण्यासाठी मिळालेला आहे़ त्या घरजागेत तक्रारदाराने तीन महिन्यापूर्वी बोअर घेतले असून, त्याची नोंद आठ अ ला लावण्यासाठी वडिलांची सही असलेला अर्ज त्यांनी ग्रामसेवक बालाजी वाघमारे यांच्याकडे दिला होता़ दोन महिन्यांपूर्वी अर्ज देवून वारंवार मागणी करूनही ग्र्रामसेवकांनी त्याची नोंद घेतली नाही़ वाघमारे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तक्रारदारास एक हजार रूपयांची मागणी केली़ तक्रारदाराने ७५० रूपये वाघमारे यांना दिले उर्वरित २५० रूपये वाघमारे यांनी आणून देण्यास सांगितले़ पैसे दिल्याशिवाय नोंद घेवून आठ अ चा उतारा देणार नाही, असेही बजावले़ त्यानंतर तक्रारदारांनी उस्मानाबादेत एसीबीच्या कार्यालयात येवून तक्रार दिली़ या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक अश्विनी भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी दुपारी समुद्रवाणी ग्रामपंचायतीत सापळा रचला़ तक्रारदाराला २५० रूपये लाचेची मागणी करून ग्रामसेवक वाघमारे यांनी स्विकारताच पथकाने कारवाई केली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक श्रीकांत बाचके हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Gramsevak Gajahad of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.