शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतागृहाच्या अनुदानासाठी सात हजाराची लाच घेताना ग्रामसेवक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 17:29 IST

ग्रामसेवकाने राहत्या घरी लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले होते

ठळक मुद्देशौचालय बांधकामासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. अनुदानाचा धनादेश देण्यासाठी केली लाचेची मागणी

औरंगाबाद: शौचायल बांधकामाच्या अनुदानाचा धनादेश देण्यासाठी एका जणाकडून सात हजार रुपये लाच घेताना एकोड,पाचोडच्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. आरोपीकडून लाचेची रक्कम हस्तगत केली. हा सापळा बीड बायपास परिसरात २० जून रोजी सकाळी यशस्वी करण्यात आला.

दीपक बाबुराव क्षीरसागर(वय ४१)असे अटकेतील ग्रामसेवकाचे नाव आहे. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकोड,पाचोड गावाचा ग्रामसेवक असलेल्या क्षीरसागर याच्याकडे घारदोनचाही अतिरिक्त कारभार आहे. घारदोन येथील तक्रारदार यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरासमोर स्वच्छतागृह बांधले. शौचालय बांधकामासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. या अनुदानाचा धनादेश मिळावा,याकरीता तक्रारदार यांनी ग्रामसेवक क्षीरसागर यांच्याकडे अर्ज केला होता. १८ जून रोजी तक्रारदार हे क्षीरसागर यास भेटले तेव्हा त्याने अनुदानाचा धनादेश देण्याकरीता सात हजार रुपये लाचेची मागणी केली. एवढेच नव्हे तर बीड बायपास परिसरातील त्यांच्या राहत्या घरी लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. 

तक्रार प्राप्त होताच अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, उपअधीक्षक बी.व्ही.गावडे, मारूती पंडित सहायक उपनिरीक्षक बाबुराव वानखेडे, रवींद्र देशमुख, रवींद्र अंबेकर, मिलिंद इप्पर, आशिया शेख आणि चालक संदीप चिंचोले यांच्या पथकाने सापळ्याचे आयोजन केले.  आज २० जून रोजी सकाळी तक्रारदार हे ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम घेऊन क्षीरसागर यांच्या निवासस्थानी गेले. तेव्हा क्षीरसागर याने तक्रारदार यांच्याकडून लाचेची मागणी करीत सात हजार रुपये घेतले. यावेळी तक्रारदार यांनी पोलिसांना इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी क्षीरसागरला लाचेच्या रक्कमेसह पकडले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस